समाज कल्याण विभागाच्या योजनांची स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न
ऐका..हो ऐका...!
अलिबाग,दि 21(जिमाका:- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची जनजागृती अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा, पोयनाड बाजारपेठ, कुर्डुस,भायमला-बहिरमपाडा, बोपोली पेण तालुक्यातील शिहू येथे करण्यात आली.
या कलापथकाचे नेतृत्व किरण काशिनाथ साळवी करीत असून कलाकार म्हणून पूर्वशा गण , समीक्षा रेडीज , शिवानी मौर्य, रिया टोपले, हर्षदा होगाडे, निशांत नवाखरकर,समृद्धी पाटील, सानिका भगत आदी कलाकार सहभागी झाले असून पथनाट्य यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी पोयनाड ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच एस.डी.काकडे, परहूरपाडा पोलीस पाटील शेखर नाईक, बोपोली ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष अश्विनी बोडेकर, बहिरीदेवी स्वयंसहायता महिला समूहच्या अध्यक्ष अस्मिता नागावकर, पोयनाड पोलीस स्टेशन-ठाणे अंमलदार डी.डी मांजरेकर, ग्रुप ग्रामपंचायत कुर्डूस सरपंच रामचंद्र कर्वे, शिहू ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित गदमले यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
000000000
Comments
Post a Comment