रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर
अलिबाग,दि.5जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल त.पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, वेदिक ट्री प्री स्कूल करंजाडे, वेद ड्राप पब्लिक स्कूल करंजाडे, से-03, शॉप नं. 56, 87 प्लॉट नं. 60/60A, विनायक आश्रय, करंजाडे पनवेल, डॉल्फिन किड्स स्कूल, से-3, प्लॉट नं. 59, के.डी.शेल्टर, करंजाडे, ता.पनवेल, ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल तळोजा, वेदांत पब्लिक स्कूल कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल करंजाडे, एस.जी.टी. इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, वेद गृह इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, ओझन्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे, प्लीजन्ट इंग्लिश स्कूल सांगडे, एस. बी. पी. इंग्लिश स्कूल शेडुंग, पायोनियर पब्लिक स्कूल पारगाव, लिटल चॅम्प ओवळे, एकलव्य स्कूल ओवळे, साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोल नाका आपटा फाटा, दि इंग्लिश स्कूल, उलवा, न्यू इंग्लिश स्कूल, कोपरा, रोहिंजण इंग्लिश स्कूल, रोहिंजण, आकृती एज्युकेशनल अँड वेलफेअर सो. एस.एम.बी. इंटरनॅशनल स्कूल उलवे.
या शाळा शासनाच्या परवानगी विना सुरु असल्याने पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यास दाखल करु नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड श्रीमती पुनीता गुरव यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment