संत गाडगे महाराज यांचे जयंतीनिमित्त कारागृहात स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

 

    रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका):- संत गाडगे महाराज हे थेारसमाज सुधारक होते. त्यांनी किर्तनातून समाज प्रबोधन, अंधश्रध्दा निर्मुलन आणि स्वच्छता संदेशाचा प्रसारकेला. त्‍यांचे जयंती निमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एकभाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांकरीता स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरीता जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

            या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते संतगाडगे महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था डॉ. मिलींद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज सुधारण्याचे चळवळीमध्ये थोर समाजसेवक संतगाडगेबाबा यांचे विसाव्या शतकातमोलाचे योगदान होते यांची जाणीव बंद्यांना करुन दिली.  तसेच संतगाडगे महाराज यांनी स्वच्छतेचे ध्येय हाती घेवून त्यांनी गावागावात जावून समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. थोर समाजसेवक संतगाडगेबाबा यांनी समाजात असलेल्या वाईट चालीरिती, परंपरा, अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता दुरकरण्याकरीता किर्तनाचे माध्यमातून प्रबोधनकरुन समाज सुधारण्याचे कार्य केले. तसेच स्वत:च्या मनाची, शरीराची व आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करणेबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमाकरीता प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग-रायगड तसेच अधीक्षकअलिबाग जिल्हा कारागृह विशाल बाळासाहेब बांदल,  कारागृह शिपाई रविंद्र वाघमारे, प्रशांत पाटल त्यादी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान