Posts

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

             अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक / कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, संघटकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.             सन 2017-18 या वर्षासाठीच्या संघटक / कार्यकर्ते या पुरस्कारासाठीच्या संबंधित अर्जदारांसाठी ऑनलाईन   अर्ज सादर करण्याची मुदत ही दि . 25 नोव्हेंबर पर्यंत आहे. तर आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, क्रीडा मार्गदर्शक यांचेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि. 5 डिसेंबर पर्यंत आहे. संबंधितांनी ऑनला...

दुग्धोत्पादन, कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनाः लाभार्थ्यांना मिळणार दुधाळ जनावरे, मांसल पक्षी; 15 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)-   दुग्धोत्पादन व कुक्कुटपालन या शेतीपुरक व्यवसायांना चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी तरतूदही प्राप्त झाली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून येत्या गुरुवार दि.15 पासून ही ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय नाविन्य पुर्ण योजना (सन 2018-19) ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य, औंध पुणे यांच्या कडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. या नाविन्य पुर्ण योजनांमध्ये खालील योजनांचा समावेश आहे. 1. दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी सहा/चार/दोन दुधाळ संकरीत गायी/म्हशींचे वाटप करणे-        1. सर्वसाधारण - रु.21,10,537/- प्रत्येकी 2 दुधाळ जनावर...

नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश; निवड चाचणी 6 एप्रिल रोजी:ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 पर्यंत

अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीत प्रवेश घेण्यासाठी  प्रत्येक जिल्हा पातळीवर  संपुर्ण देशात निवड चाचणी घेतली जाते. यंदा ही चाचणी परीक्षा 6 एप्रिल 2019 रोजी प्रत्येक तालुक्याच्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. या चाचणीचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील जे विद्यार्थी इयत्ता 5 वी च्या वर्गात शासनमान्य शाळेत शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत भरावेत. अधिक माहितीसाठी जवाहन नवोदय विद्यालय, निजामपूर चे प्राचार्य पी.के. नारायणन यांना भेटावे अथवा 02140-268386 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश; निवड चाचणी 2 फेब्रुवारी रोजी: ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 पर्यंत

अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 2 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.  त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची अंतिम मुदर दि.30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य पी.के. नारायणन यांनी केले आहे.

नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वेसेवेचा शुभारंभ एकत्रित विकासासाठी ‘महामुंबई’चा विचार- मुख्यमंत्री फडणवीस

Image
खारकोपर ता . पनवेल , जि . रायगड , दि .11( जिमाका )- पुर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला . आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल . मुंबई , नवी मुंबई , एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘ महामुंबई ’ म्हणूनच विचार करावा लागेल , त्यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे , असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारकोपर ता . पनवेल येथे केले . नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा आज   खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन   सोहळा आज खारकोपर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला . विविध सेवांचे लोकार्पण यावेळी नेरुळ सीवूडस दारावे/ बेलापूर-खारकोपर (फेज १) नवीन लाईन व पनवेल-पेण विद्युतीकरण कार्याचे उद्घाटन ,   बेलापूर/नेरुळ-खारकोपर विभागातील ई एम यु ...

उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    राज्याचे खनिकर्म, उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.9 रोजी रात्रौ आठ वा. माणगाव येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. मोटारीने रोहाकडे प्रयाण.   सकाळी दहा ते दुपारी बारा वा.रोहा औद्योगिक क्षेत्र भेट.   दु.बारा वा. रोहा येथून मुंबई कडे प्रयाण. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.9 रोजी सायं. सात वा. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. महाड एमआयडीसी येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी अकरा वा.श्रीवर्धन येथे आगमन. दुपारी तीन वा. श्रीवर्धन येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी साडे चार वा. मुरुड येथे आगमन. सांय. सात वा. मुरुड येथून साळाव मुरुडकडे प्रयाण. सायं. साडे सात वा. साळाव मुरुड येथे आगमन व मुक्काम. रविवार दि.11 रोजी सकाळी दहा वा. साळाव मुरुड येथून रोहाकडे प्रयाण. सकाळी साडे अकरा वा. रोहा येथे आगमन. दुपारी दोन वा. रोहा येथून तळाकडे प्रयाण. दुपारी तीन वा. तळा येथे आगमन. सायं. सहा वा. तळा येथून मुंबई कडे प्रयाण. 00000