Posts

अलिबाग तालुक्यातील झिराड, आवास, रेवदंडा, कुरकुंडी कोलटेंभी, बामणगाव, बेलकडे, ताडवागळे व काविर या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग , जि.रायगड , दि. 22 ( जिमाका):- निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील झिराड, आवास, रेवदंडा, कुरकुंडी कोलटेंभी, बामणगाव, बेलकडे, ताडवागळे व काविर या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक दि.21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहिर केलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.30 नोंव्हेंबर ते सोमवार दि. 06 डिसेंबर 2021 (दि.4 व 5 डिसेंबर 2021 या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) , वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत.   नामनिर्देशन छाननी करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.07 डिसेंबर 2021, सकाळी 11.00 वा.पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ-गुरुवार, दि.09 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक   व वेळ- गुरुवार, दि.09 डिसें...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार   हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.20 वा. फोर ओक्स हेलिपॅड, महाबळेश्वर, जि.सातरा येथे आगमन. सकाळी 11.25 वा . हेलिकॉप्टरने, दिवेआगर, ता.श्रीवर्धन, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.55 वा. कार्ले गाव हेलिपॅड, दिवेआगर जवळ, ता.श्रीवर्धन, जि.रायगड येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा. सुवर्ण गणेश मंदिर,दिवेआगर येथे आगमन व सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा.(खासदार सुनिल तटकरे), दुपारी 1.30 ते दुपारी 2.45 वा. राखीव. (श्री.उदय बापट, सरपंच दिवेआगर), नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 2.55 वा. कार्ले गाव हेलिपॅड, दिवेआगर जवळ, ता.श्रीवर्धन येथे आगमन. दुपारी 3.00 वा. हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण. ००००००

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका) :- गेल्या दोन वर्षात कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शासकीय वसतिगृह बंद होती.   यावर्षी मात्र करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे बरीच महाविद्यालये सुरू झालेली आहेत.   त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाचा राहण्याची सोय व्हावी, यासाठी मुंबई विभागातील शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.   मुंबई विभागांतर्ग मुंबई शहर या जिल्ह्यात मुलांचे 2 व मुलींचे 1,   मुंबई उपनगर मध्ये मुलांचे 3 व मुलींचे 1,   ठाणे जिल्ह्यात मुलांचे 4 व मुलींचे 4, पालघर जिल्ह्यात मुलांचे 1, रायगड जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 4, रत्नागिरी जिल्ह्यात मुलांचे 6 व मुलींचे 4 आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 5 असे एकूण 41 वसतिगृह कार्यरत आहेत. मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यात जावळी, ता.माणगाव येथे शास...

अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे.   या कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न झाली.   यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्री.दिलीप भोईर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी तसेच   झिराड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.      या विशेष ग्रामसभेच्या व मतदार नोंदणी शिबिराच्या निमित्ताने मतदार यादीचे वाचन, नव मतदार नोंदणी, आधीच्या मतदारांच्या यादीची तपासणी आदी महत्वाची कामे करण्यात आली. दि.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण असलेल्या भारतीय नागरिकास मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल. मात्र मतदार यादीत नाव असेल तरच आपण मतदान करू शकतो, संविधानाने दिलेल्या या मौलिक अधिकाराचा वापर करण्याची संधी मतदानाच्या वेळी कोणत्याही पात्र मतदाराने गमावू नये, या...

नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रणाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.12 नोव्हेंबर 2021 अन्वये नमूद केलेल्या नगरपंचायतीकरिता नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता पुढील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1) पाली- रोहा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, 2) तळा- पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, 3) माणगाव- माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, 4)   म्हसळा- श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, 5)   पोलादपूर- महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड.               या अधिकाऱ्यांनी   नगरपंचायत सदस्य पदाच्या (नागरिकांचा मागास प्रवर्ग)आरक्षणाची सोडत काढणे, (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवणे, ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे.        ...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.30 नोव्हेंबर पर्यंत

  अलिबाग जि.रायगड, दि.16 (जिमाका) :-   शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 15 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या   आहेत.               60 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.          नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.             ...

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर 2021-22 करिता प्रस्ताव द्यावेत

    अलिबाग जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- शासनाने आंबा व काजू पिकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई लि. कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.       या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, कमी तापमान 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख, गारपीट दि.01 जानेवारी ते 30 एप्रिल, विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021.        आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.15 मे, कमी तापमान दि.1 जानेवारी ते दि.10 मार्च, जास्त तापमान दि.1 मार्च ते दि.15 मे, वेग...