Posts

शासकीय व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे

    अलिबाग,दि.14(जिमाका) :-   ज्या नागरिकांना आधारकार्ड मिळाले आहे, परंतु दहा वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केलेले नाही, अशा आधारकार्डधारकांसाठी  “ डॉक्युमेंट अपडेट ”  हे नवीन फिचर विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा कागदपत्रे अद्ययावत करून त्यांचा आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना  “ डॉक्युमेंट अपडेट ”  करण्याचे आहे, त्यांनी My Aadhaar (ऑनलाईन) पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्र भेट देऊन आपले आधारकार्ड अद्ययावत करण्यात यावे.  सन 2011 पासून देशांमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटीज ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. यापुढे शासकीय  व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नवीन आणि अद्ययात तपशीलांसह आधारकार्ड सादर करणे आवश्यक  आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, ...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 35 हजार 265 प्रकरणे निकाली 18 कोटी 90 लाख 84 हजार 838 रूपयाची तडजोड रक्कम वसूल

Image
    अलिबाग,दि.14(जिमाका) :- न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामजस्याची भूमिका घेउन लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. दि. 12 नोवेंबर 2022 रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 35 हजार 265 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री अमोल अ. शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयांत दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 1 लाख 05 ह...

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते “रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022”चे उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
         अलिबाग, दि.14 (जिमाका):- उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 व दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे “ रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022 ” चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा रायगड ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उत्साहात   संपन्न झाले.      यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर म्हणाले की, ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या डिजिटल युग चालू आहे. मात्र या डिजिटल युगात तुम्ही जोपर्यंत पुस्तक हातात घेणार नाहीत आणि त्या पानांचा आवाज किंवा पानांचा सुवास पुस्तक वाचताना दरवळणार नाही तोपर्यंत माझ्या मते डिजिटल पुस्तकांची ओळख पुढच्या पिढीला होणार नाही. आजही दिवाळी आली की आपण दिवाळी अंक खरेदी करतो, ते आवडीने वाचतो. तरुण पिढीमध्ये या डिजिटल चळवळीमध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकाचा सुवास नक्कीच दर...

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) प्रमाणे मनाई आदेश जारी

    अलिबाग,दि.14(जिमाका) :- ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा. राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.09 नोव्हेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली असून दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान व दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 2 मधील पनवेल तहसिल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंध्रण, भाताण, कानपोली, केळवणे, नेरे, दिघाटी, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिरढोण, शिवकर, करंजाडे, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत नितळस ग्रामपंचायत तसेच उरण तहसिल विभागातील उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतुम, कळंबुसरे, बोकडविरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, चिर्ले, भेंडखळ, नवघर, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत पाणजे, डोंगरी, करळ, जसखार, मोरासागरी पोलीस ठाणे...

पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

      अलिबाग, दि.14 (जिमाका):- भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.      यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

“स्वच्छ विद्यालय पुरस्कार” राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची निवड

Image
  अलिबाग, दि.11 (जिमाका):-  संचालक, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रान्वये सन 2021-22  “ स्वच्छ विद्यालय पुरस्कार ”  राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेची निवड झाल्याचे कळविले आहे. या स्वच्छ विद्यालय पुरस्काराचा कार्यक्रम केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेचे प्राचार्य व त्यांचे सहकारी शिक्षकांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात आला. 00000

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “चला उद्योजक होऊया” ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Image
  अलिबाग, दि.11 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील व्यवसाय इच्छुक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये विविध विषयातील तज्ञ मंडळींकडून व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. बदलत्या काळानुरूप शेती या पारंपरिक व्यवसायाचे स्वरूपही बदलते आहे. या पारंपरिक उद्योगास नवीन शेतीपूरक जोड धंद्यांची साथ दिल्यास निश्चितच चांगली उत्पन्न निर्मिती करता येईल. यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्यामार्फत मंगळवार, दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता  “ चला उद्योजक होऊया ”  या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयांतर्गत कृषी क्षेत्रातील नव उद्योजक श्री.हेमंत कोंडीलकर हे सेंद्रिय खत निर्मितीतून स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र सगळ्यांसाठी खुले असून गुगल-मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या ऑनलाईन सत्रामध्ये सहभ...