लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे
रायगड(जिमाका)दि.30:- राज्य सरकारने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी दिले. आज लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे, उपजिल्हाधिकारी सा.प्र. विठ्ठल इनामदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.म्हसे म्हणाले की, लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला पारदर्शक, गतीमान आणि कालमर्यादेत प्रभावी सेवा मिळणार आहेत. या कायद्यामुळे जनतेच्या हक्कांच...