Posts

उद्यापासून कामोठे येथे रायगड जिल्हा कृषि महोत्सव

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- रायगड जिल्ह्याचा कृषि महोत्सव दिनांक 28 ते 31 डिसेंबर या कालावधी त खांदेश्वर रेल्वे स्टेशन , सेक्टर क्र. 29, कामोठे , ता. पनवेल , जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्हा कृषि महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व आत्मा प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे   यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली कि, बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विस्ताराला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थीक दृष्ट्या उन्नत होऊन जागतीक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान ...

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारः पत्रकारांकडून प्रवेशिका मागविल्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- केंद्र पुरस्कृत स्वर्ण जयंती ग्रां स्वरोजगार योजनेच्या माध्यमातून  दारिद्र्य रेषेखालील  आदर्श व सक्षम स्वयं सहाय्यता बचत गटांना प्रोत्साहित कअण्यासाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची प्रचार प्रसिद्धी करुन  जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी हातभार लावणाऱ्या  पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्र, लेखमाला आदींचा विचार करुन पत्रकारांना पुरस्कार दिला जाणार आहे. तरी या योजनेसंदर्भात महिला बचतगटांच्या चळवळीला पोषक लेखन केलेल्या पत्रकारांनी तात्काळ आपले प्रस्ताव जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा रायगड, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामिण यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

अनाथ प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत कार्यरत शासकीय, स्वयंसेवी बालगृहामध्ये दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे त्यांना विविध शासकीय लाभापासून वंचित रहावे लागते. अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा याकरिता शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय 02 एप्रिल 2018 रोजी पारित झालेला आहे. त्या अनुषंगाने बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहामधून जे अनाथ मुले, मुली बाहेर पडलेले आहेत अशा अनाथ मुला-मुलींना शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साधून त्या संबंधित संस्थेकडे अनाथ असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम;शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2018-19 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांना विविध विषयांबाबत प्रक्षेत्र प्रशिक्षण द्यावयाचे आहे.  कृषि विभागाच्या विविध योजनांमध्ये लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छित शेतकऱ्यांकडून राज्यांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण या कार्यक्रमाकरिता दि.31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.  शेतकऱ्यांनी आपले प्रशिक्षण विषयावरील अर्ज हे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे विषय: फळबाग लागवड, आंबा घन लागवड, फळबाग व्यवस्थापन-बहार व्यवस्थापन, फळपिकनिहाय अधिक उत्पादनक्षम जातीची ओळख, उपलब्धता, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मिक किड रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजू प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, सिताफळ,आवळा,डाळिंब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायपनिंग चेंबर असे आहेत.     या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता प्रशिक्षणार्थींची नाश्ता, भोजन व निवास व्यवस्था पाच दिवसाच्या प्रशिक्षणाच्या काला...

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  गुरुवार दि.27 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि.27 रोजी सकाळी साडे नऊ वा. वाशी येथे आगमन व वाशी खारेपाट विभागातील मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाईपलाईन लोकार्पण सोहळा स्थळ: जगदंबा मंदिर परिसर वाशी ता.पेण.   साडे दहा वा. वाशी येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आज (दि.27)

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गुरुवार दि. 27 रोजी  राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय शेवाळे हे राह्णार असून जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.  सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आला असून उपस्थितीचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे यांनी केले आहे.

पनवेल येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- पनवेल महानगर पालिका व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेल यांच्या सयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी पुतळ्याजवळ, ओल्ड पनवेल येथे शुक्रवार दि. 28 रोजी सकाळी 10वा. बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत.  सदर कंपन्यांना दहावी व बारावी, पदवी, पदवीधर (सदर रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.  या मेळाव्यात सहभाग घेऊन इच्छिणाऱ्या उमदेवारांनी या विभागाच्या https://rojar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे.   तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली   असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.   तस...