Posts

‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ चे आवाहन यशस्वी महाड, पोलादपूर,‌ माणगाव मधील 125 ते 150 शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
दिनांक :- 09/04/2020     दिवस रविवार, दि.5 एप्रिल 2020, ‌स्थळ- महाड येथील जनकल्याण रक्तपेढी..सकाळपासूनच येथे शिक्षक परिषदेच्या शिक्षक कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती.   मात्र ही लगबग नेहमीच्या उत्साहपूर्ण अशा कार्यक्रमाबाबत नक्कीच नव्हती.   ही लगबग होती ती… महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा रायगडने   ‘ करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ च्या केलेल्या आवाहनाने संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिराच्या प्रतिसादासाठी…!        “ राष्ट्रहितासाठी शिक्षणहित,शिक्षण हितासाठी शिक्षकहित‌,समाज हितासाठी शिक्षकहित ! ” शिक्षक परिषदेच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा रायगडने   ‘ करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ असे आवाहन त्यांच्या शिक्षक सभासदांना केले होते.     सध्या जगात करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भारत व महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही खंबीरपणे करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहेत. य...

करोना विरुध्दच्या लढाईत.. ग्रामसेवक बनले ग्रामसैनिक..!

Image
यशकथा क्र.2                                                                                                दिनांक :- 09/04/2020     वर्षभराची विविध विभागाची उद्धिष्ट साध्य करत मार्च अखेर दमछाक होणाऱ्या   ग्रामसेवकांसाठी यंदाचे मार्च अखेर नोकरीची परीक्षा घेणारे ठरले. जानेवारी, फेब्रुवारी च्या दरम्यान जगात हाहा:कार माजविलेल्या करोना विषाणूचे संकट शहरासह ग्रामीण भागावर आले ते मार्च मध्ये. करोना विषाणूचा   प्रादूर्भाव, लक्षणे, उपाययोजना याबाबत सर्वत्र पसरलेले समज, गैरसमज या साऱ्या गोष्टींना योग्य ...

जिल्ह्यातील 21 शिवभोजन केंद्रातून 2 हजार 142 थाळ्यांचा गरजू नागरिकांनी घेतला लाभ कोणताही गरजू नागरीक उपाशी राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन घेत आहे काळजी

वृत्त क्रमांक:-148                                                                                         दि.09 एप्रिल 2020 अलिबाग,जि.रायगड.दि.09 (जिमाका) –   करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नि...

एचआयव्ही संसर्गितांच्या औषध पुरवठ्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा घेत आहे काळजी

वृत्त क्रमांक:-149                                                                                         दि.09 एप्रिल 2020 अलिबाग,जि.रायगड.दि.09(जिमाका): कोविड-19 या   आजाराच्या   प्रतिबंधाकरिता महाराष्ट्र शासनाकडून   करण्यात आलेल्या   लॉकडाऊनमुळे   एचआयव्ही संसर्गितांच्या औषधांमध्ये खंड पडू नये, याची खबरदारी म्हणून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली व   महाराष्ट्र एड्स   नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई यांच्या आदेशानुसार एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, अलिबाग येथे एचआ...

करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत गव्हाण,वहाळ,उलवे व तरघर गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण एकूण अठरा पथकांनी केले तब्बल 2 हजार 500 कुटुंबांचे सर्वेक्षण

Image
अलिबाग, रायगड,दि.9 (जिमाका) - करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना या विषाणूला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे.   करोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देण्यात थैमान घातलेले आहे.   यावर महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर यांची पनवेल तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे, संजय भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नखाते व बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, सहा.गटविकास अधिकारी विश्वास म्हात्रे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाड सेविका,आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर या सर्व कर्मचाऱ्यांनी   प्राथमिक शाळा वहाळ या ठिकाणी कार्यशाळा घेऊन त्यामध्ये हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता, अत्यंत महत्वाचे असेल तरच घराबाहेर पडताना मास्क वापरणे तसेच सोशल डिस...

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 08 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

वृ.क्र.146                                                                                                        दिनांक :- 09/04/2020 अलिबाग,दि.09 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 08 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve   नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 718. निरीक्ष...

निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या पो.ह. श्रीकांत ठाकूर यांच्या वारस पत्नीला जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते रु.10 लाख सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द

वृत्त क्रमांक:-145                                                                                     दि.09 एप्रिल 2020 अलिबाग,जि.रायगड.दि.09 (जिमाका) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका-2017 च्या वेळी पोलीस हवालदार श्रीकांत केशव ठाकूर   हे ता.माणगाव, जि.रायगड येथे निवडणूक कर्तव्यावर मतमोजणी दरम्यान बंदोबस्तावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सादर करण्यात आला होता.   ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शास...