माणगावात फिरता पशु वैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
अलिबाग, जि.रायगड, दि.25(जिमाका): महाराष्ट्र शासन व पशूसंवर्धन विभागाच्या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री पशूसंवर्धन योजनेतून माणगाव तालुक्यासाठी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला असून याचा उद्घाटन आज गुरुवार, दि.25 फेब्रुवारी रोजी माणगाव प्रांत कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फिरत्या दवाखान्याच्या रुग्णवाहिकेची व त्यातील औषधांची पाहणी केली. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा पशु...