“दिलखुलास” कार्यक्रमात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग-2 प्रसारित
अलिबाग,जि.रायगड,दि.25(जिमाका):-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” कार्यक्रमात
“करोनाशी सामना करताना”
या विषयावर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या विशेष मुलाखतीचा भाग--2 आज
(दि.25 फेब्रुवारी) रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर
या ॲपवरून प्रसारित झाला. काल बुधवार, दि.24 फेब्रुवारी रोजी या मुलाखतीचा भाग पहिला
प्रसारित झाला होता. त्यास श्रोत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
या मुलाखतीचा भाग-3, उद्या शुक्रवार दि.26 फेब्रुवारी
रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारित होणार आहे. प्रा.सुभाष कदम यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून
सुरू असलेल्या उपाययोजना, करोना काळात सरकारी आदेशांचे पालन, कंटेनमेन्ट झोन करताना
उद्भवलेल्या अडचणी, करोना काळातील नवीन अनुभव अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
0000000
Comments
Post a Comment