महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी इच्छुकांनी कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईने पध्दतीने सादर करावेत
रायगड-अलिबाग,दि.08 (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, रायगड मार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra.
अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांच्या स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे महामंडळ राबवीत असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी भारत शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजने (PM-AJAY) अंतर्गत या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सक्षमीकरण घडविणे आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-50 टक्के अनुदान योजना- एकूण प्रकल्प खर्च 50,000/-, महामंडळाचे अनुदान : 25000/-, बँक कर्ज :250000/-या योजनेद्वारे लघु व्यवसाय, सूक्ष्म उद्योग व उपजीविकेस पूरक अशा उपक्रमांना चालना दिली जाते.
बीज भांडवल योजना-प्रकल्प खर्च 50,001/- ते 5,00,000/-, महामंडळ सहभाग : 20 टक्के (जास्तीत जास्त 50,000/- अनुदान+ बीज भांडवल 50,000/-), बँक सहभाग : 75 टक्के –रु.3,75,000/- (बँकेच्या विद्यमान व्याजदराने कर्ज),लाभार्थी सहभाग: 5 टक्के 25000/- कर्ज परतफेडीचा कालावधी: 3 ते 5 वर्ष या योजनेद्वारे उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयुक्त असून, लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारता येतो.
थेट कर्ज योजना : महामंडळामार्फत थेट कर्ज योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रु.1,00,000/- पर्यंत कर्ज वार्षिक 4 टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. ही योजना जलद व सुलभ पद्धतीने अंमलात आणली जाते, ज्यामुळे अल्पावधीतच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करता येतो. प्रकल्प खर्च- रु.1,00,000/-, महामंडळ सहभाग : 50 टक्के (अनुदान जास्तीत जास्त रु.50,000/-), थेट कर्ज रक्कम 45 टक्के (रु.45,000/-), लाभार्थी सहभाग 5 टक्के (रु.5,000/-).
०००००००
Comments
Post a Comment