Posts

देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत. --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Image
दिनांक :-08/04/2017                                                                                                        वृत्त क्र.188 देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत.                            --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अलिबाग दि. 8 :- (जिमाका)     बँक असो की पतसंस्था या औद्योगिक व व्यापा...

रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती                                                      -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.31 (जिमाका), रायगड जिल्हयासाठी शासनाने दिलेल्या महसूल वसूली उद्दिष्टांची 101.88 टक्के अशी विक्रमी वसूली करण्यात आली. या वसूली बद्दल जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सन 2016-17 या वर्षासाठी रायगड जिल्हयाला अ पत्रकासाठी 86 कोटी, गौण खनिजासाठी 115 कोटी व करमणूक करासाठी 12.50 कोटी असे एकूण 213.47 कोटी एवढे वसूलीचे उद्दिष्ट शासनामार्फत देण्यात आले होते. 31 मार्च, 2017 अखेर या उद्दिष्टांपैकी अ पत्रक 95.58 कोटी, गौण खनिज 105.57 कोटी, करमणूक 15.71 कोटी असे एकूण 217.48 कोटी एवढी वसूली साध्य केलेली आहे. दिलेल्या व...

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक

Image
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला  राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक अलिबाग दि.31, (जिमाका)  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास सन 2016 या वर्षाकरीता राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनात गतवर्षी राबविण्यात आलेल्या  प्रशासकीय उपक्रमाची शासनाने दखल घेवून हे पारितोषिक जाहिर केले आहे. या पारितोषिक मिळाल्या बद्दल गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.  जिल्हा व राज्य स्तरावर 2002 पासून प्रतिवर्षी या अभियान अंतर्गत स्पर्धा घेतली जाते.  त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला सहभाग नोंदविला होता. सन -2016 मध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत प्रशासकीय सुधारणेबाबत पुढील बाबींकडे विशेष लक्ष पुरविलेले गेले.  1) कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता 2) कार्यपध्दतीचे सुलभीकरण 3) ई-गर्व्हनस 4) अनुत...

लाट उष्णतेची-घ्या काळजी आरोग्याची- डॉ.राजू पाटोदकर

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad लेख क्र.15                                                                                                   दिनांक :- 30  मार्च 2017 लाट उष्णतेची-घ्या काळजी आरोग्याची आपल्या आरोग्याची काळजी  घेणे आपल्याच हाती असते. केवळ आपलं किंवा आपलेच कुटूंबिय नव्हे तर आपले हितसंबंधी आणि पर्यायाने सं...

क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे

Image
क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा                                            -- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे अलिबाग(जिमाका)दि.24:-   औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन क्षयरोग निर्मुलनाचे काम करणे आवश्य्क आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज येथे केले. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरुळ ता.अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.अजित गवळी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,परिवहन मंडळाचे व्यवस्थापक श्री.गिते,श्रीमती अनिता गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. ड...

राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर

Image
राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त                                                          - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर             अलिबाग दि.23 (जिमाका), राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे भविष्यकाळासाठी उपयुक्त असून विविध शिबिरातून मिळणारी ज्ञानाची व संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज येथे केले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीनविरा येथील विश्रामगृह येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय निवासी शिबिराच्या सांगता समारोप प्र...

सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या

24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या        जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यांत येत आहे. यानिमित्त क्षयरोगाची माहिती व्हावी,क्षयरोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी.  क्षयरोग नियंत्रणात राहण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही,तसेच क्षयरोगाची लागण होऊ नये आणि पुढील पिढी क्षयमुक्त व्हावी, यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबतची माहिती देणारा लेख…             क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टूबरक्युलोसीस या जंतूमुळे होतो. या जंतूचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 रोजी लावला.या शोधाच्या एका शतकानंतर म्हणजेच 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट् टूबरक्युलोसीस  अँड लंग डिसीज (IUATLD) यांनी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग  रोग दिन म्हणून साजरा केला जाईल,असे जाहिर केले. तेंव्हापासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जात आहे. क्षयरोगाची लक्षणे दोन आठवडे किंवा जास्त काळ खो...