Posts

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मुठवली तर्फे तळे विकास कामांचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन.

Image
       अलिबाग दि.17,   महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मुठवली येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम संपन झाला. सदर कामे जिल्हा परिषद फंड , पंचायत समिती फंड,   कृषी विभाग फंड, ग्राम सामाजिक परिवर्तन फंड , ग्राम पंचायत फंड आणि स्वदेस फाऊंडेशन फंड असे एकूण 3 कोटी 90 हजार रुपये मधून झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळा काल 16/12/19 रोजी    संपन्न झाला. तसेच सन 2019-2020 चा आराखडा मधील   कामांचे उद्घाटण करण्यात आले.          सदरची विकास कामे निवी, निवि आदिवासी वाडी, नीवी बौद्ध वाडी मुठवळी, उमरोली दिवाळी, उमरोळी बौद्ध वाडी आणि उमरोली आदिवासी वाडी येथे घेण्यात आली. यावेळी   जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसीलदार   प्रियांका आयरे,   रसिका   बलगे मिशन असोशिएट ग्रा.सा. प.अभियान, पवार साहेब स्वदेस फाऊंडेशन, सरपंच शर्मिला बडेकर, उपसरपंच   मिलिंद दळवी, ग्रामसेवक अश्विनी शेलार, ग्राम पंचायत सदस्य सौ पूनम गलांडे व सौ. बाबारे (पोलिस पाटील),   ग्राम परि...

24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

अलिबाग (जिमाका)दि.17:- 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. त्या अनुषंगाने जिल्हयामध्ये 24 डिसेंबर,2019 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून राज्य व जिल्हा स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड   पुरवठा विभागामार्फत, अलिबाग येथील अलिबाग राज्य परिवहन आगारातील (एसटी स्टँड) येथील मोकळया जागेमध्ये ग्राहक उपयोगी बाबीचे (विविध कार्यालयातील शासकीय योजना व नियमित ग्राहकोपयोगी बाबी) स्टॉल लावून विविध योजना व वस्तू बाबतची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता   रविंद्र नगरे,अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग जि. रायगड यांच्या शुभहस्ते होणार असून रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर दिलीप हळदे(भा.प्र.से), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद रायगड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावर्षी रविवार दिनांक 22 डिसेंबर ते शनिवार दिनांक 28 ...

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार पडताळणी कार्यक्रम

अलिबाग दि.17, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुन:रीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 11 नोव्हेंबर, 2019 ते 2 मार्च 2020 पर्यंत   राबविला जाणार असून बिनचूक छायाचित्र मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. सदरचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. पुन:रीक्षण कार्यक्रमाचे टप्पे :- मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) मोहिम स्वरुपात SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या इतर पुर्व-पुन:रीक्षण कार्यक्रम कालावधी शुक्रवार दि. 20 डिसेंबर, 2019 पर्यंत. पुन:रीक्षण कार्यक्रम एकत्रित प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सोमवार दि.30 डिसेंबर, 2019, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि.30 डिसेंबर, 2019 ते गुरुवार दि.30 जानेवारी 2020, विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार दि.4 जानेवारी, 2020 आणि रविवार दि.5 जानेवारी 2020, शनिवार दि.11 जानेवारी 2020 आणि रविवार दि.12 जानेवारी 2020. दावे व हरकती निकालात काढणे सोमवार...

पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने पेण जि.रायगड येथे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन

नवी   मुंबई ,   दि .17 :-   पत्र सूचना कार्यालय ,   मुंबईच्यावतीने पेण जि . रायगड येथे पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन दि .26   डिसेंबर   2019   रोजी करण्यात आले आहे .   केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .   या वार्तालाप कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकार विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील .   पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले या विभागाच्या कार्याबद्दल उपस्थितांना विस्तृत माहिती देतील . या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी   10.00   वा .   हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल ,   आंबेघर गणपतीवाडी ,   पेण खोपोली रोड पेण जि . रायगड येथे करण्यात येईल .   या कार्यशाळेत श्री .   प्रसाद केरकर कृषिवल समूह संपादक ,   श्री .   सुधीर गव्हाणे कुलगुरु एम . जी . एम . औरंग...

'आयपास' प्रणालीमुळे निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास मदत -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, दि. 17 (जि.मा.का.) : 'आयपास' या प्रणालीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत नागरिकांना माहिती मिळणार आहे. त्यामुळे पारदर्शीपणा राहणार आहे. हे तत्व लक्षात घेतल्यास निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.           जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथील सभागृहात 'आयपास' इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ॲटोमेशन सिस्टिम बाबत आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, आदी उपस्थित होते.             जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून आयपास या प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीचा निधी जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत व्यवस्थित खर्च होतोय की नाही यासाठी प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी ही प्रणाली राज्य...

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण 25 पर्यंत अर्ज मागितले

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) -   मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र दि.01 जानेवारी 2020 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे होणार आहे.   त्यासाठी मच्छिमार युवकांकडून 25 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.   या प्रशिक्षणचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून 2020 (6 महिने).   त्यासाठी   आवश्यक पात्रता याप्रमाणे : उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष.   (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडावी), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडावी). क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.   (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी),   उमेदवारास पोहता येणे   आवश्यक.     प्रशिक्षण शुल्क : प्रतिमाह 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र.   दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील ...

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) -महिला व बालकल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद या विभागाची माझी कन्या भाग्यश्री या योजनेमधील   जिल्ह्यातील एकूण 110 लाभार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सभापती श्रीम.उमा मुंडे, सदस्य चित्राताई पाटील, प्रियदर्शनी पाटील, मानसी दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बा.क.नितिन मंडलिक या मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.               या कार्यक्रमाचे नियोजन महिला व बाल कल्याण विभागाच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.रंजिता थळे,प्रकल्प विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.अपर्णा शिंदे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्र संचलन बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे यांनी केले. 000000