Posts

चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.        यावेळी खा.सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील (सा.प्र.),   जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बी.के आर्ले, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा आर.पी.कोळी, शाखा अभियंता ग्राम...

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 451 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 525

वृत्त क्रमांक :- 687                                                                                                 दिनांक :- 18 जून 2020          अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 451 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-297, पनवेल ग्रामीण-89, उरण-29, खालाप...

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांच्या मदत वाटपासाठी दि.20 व 21 जून या शासकीय सुट्टयांच्या दिवशीही शासकीय कार्यालये राहणार सुरु

अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) : रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिके, मालमत्तेचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शेती पिके, मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पाहता झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत वाटप करणे आवश्यक आहे.   दि. 20 व 21 जून या दिवशी शासकीय सुट्टी आहे. मात्र नुकसानग्रस्त जनतेला मदत वाटपावर या शासकीय सुट्टीचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे, पंचनामे मंजूर करणे, मंजूर पंचनाम्याप्रमाणे व शासनाच्या आदेशानुसार आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीची देयके तयार करणे, ही देयके कोषागारात सादर करुन मंजूर करून घेणे व मंजूर रक्कम संबंधित बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे, या सर्व कामांसाठी दि. 20 व 21 जून या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सर्व कार्यालये सुरू ठेवून मदत वाटपाची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.   यासाठी ...

चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

अलिबाग,जि.रायगड, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.रोहा व कर्वे सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील बारसोली आदिवासी वाडीतील लाभार्थ्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गाव कमिटी अध्यक्ष नामदेव म्हसकर, सरपंच सचिन रटाटे, यशवंत रटाटे, उपसरपंच, रोहिदास पाशीलकर, उत्तम म्हसकर,  बी.एन. कदम, सी.बी.जोशी, दीपक चिपळूणकर आदि उपस्थित होते. ०००००

चक्रीवादळात नुकसान झालेल्या पेण तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड, दि. 18 (जिमाका) :-   जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे   जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   या चक्रीवादळात नुकसान झालेल्या   पेण तालुक्यातील भिक्या धर्मा पवार, बेलवडे बुद्रुक (प्रधानवाडी), रु.1 लाख 50 हजार, नथू रामदास वाघमारे, मुंगोशी (प्रधानवाडी), रु.72 हजार, वामन नामदेव आधान, अंधार्ने, रु. 1 लाख, सोमा गणपत वाघमारे, बोरगाव, रु.1 लाख 50 हजार,   असे एकूण 4 लाख 72 हजार   रुपयांचे   मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, डी.बी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार डॉ.अरूणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, वसुधा पाटील, दयानंद भगत, वैकुंठ पाटील, चैताली पाटील, अविनाश म्हात्रे, परशुराम मोकल, अरुण नाईक, नरेश गावंड आदि उपस्थित होते. 0000

चक्रीवादळात नुकसान झालेल्या पनवेल तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

अलिबाग,जि.रायगड, दि. 17 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळात नुकसान झालेल्या  पनवेल तालुक्यातील खैरवाडी गारमाळ येथील महादीबाई गोमा थोराड, पूर्णतः नुकसान रक्कम 1 लाख 56 हजार 100, पिंट्या मारुती थोराड पूर्ण नुकसान रक्कम रुपये 1 लाख 13 हजार 500, पोशा आंबो थोराड मध्यम नुकसान  रूपय 95 हजार 100, अंबो नामा थोराड मध्यम नुकसान रक्कम रुपये 39 हजार 100 असे एकूण 4 लाख 3 हजार 800 रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पनवेल दत्तात्रय नवले, तहसिलदार, अमित सानप, नायब तहसिलदार, राहुल सूर्यवंशी, विजय कुमार साळवे, प्र.गटविकास अधिकारी, श्री. भोळे आदि उपस्थित होते. 0000

उप प्रादेशिक परिवह कार्यालय, पेण येथे वाहन विषयक व लायसन्स विषयक सर्व कामे सुरु

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)- करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील वाहन व लायसन्स   विषयक कामकाज   स्थगित करण्यात आले होते.               उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दि.18 मे 2020 पासून नवीन नोंदणी विषयक तर दि01 जून 2020 पासून परिवहन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे व नुतनीकरण करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. तसेच दि.18 जून 2020 पासून शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे व वायुवेग पथक कामकाज सुरु करण्यात येत आहेत.             या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट प्रणालीवर) निर्धारित करणे आवश्यक राहील. श...