Posts

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 14 हजार 378 जणांनी केली करोनावर मात

                  अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 378 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 361 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1497, पनवेल ग्रामीण-353, उरण-112, खालापूर-233, कर्जत-79, पेण-279, अलिबाग-197, मुरुड-23, माणगाव-73, तळा-8, रोहा-242, सुधागड-27, श्रीवर्धन-16, म्हसळा-13, महाड-108, पोलादपूर-9 अशी एकूण 3 हजार 269 झाली आहे.               कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-6 हजार 194, पनवेल ग्रामीण-1 हजार 997, उरण-821, खालापूर-930, कर्जत-495, पेण-1149, अलिबाग-976, मुरुड-133, माणगाव-325, तळा-21, रोहा-496, सुधागड-33, श्रीवर्धन-134, म्हसळा...

नजिकच्या काळात निसर्ग चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सुविधांसह दर्जा सुधारण्यास प्रयत्नशील -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग, जि.रायगड, दि.8 (जिमाका)-:   रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग निसर्ग चक्रीवादळामुळे क्षतीग्रस्त झाला. यात काही शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीचे तसेच शैक्षणिक सोयीसुविधांचे अतोनात नुकसान झाले. नजिकच्या काळात   चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सोयीसुविधांसह दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दोशी वकील आर्ट्स कॉलेज येथील सभागृहात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयांना संगणक व इतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.               यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, अशासकीय महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवारे, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय शेटे, प्रदीप...

हुश्श...रायगडकरांना दिलासा..! जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली

    अलिबाग,जि.रायगड दि.08 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.40 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.80 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.50 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 27 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 130.86 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 23.00 मि.मी., पेण-50.00 मि.मी., मुरुड-8.00 मि.मी., पनवेल-35.60 मि.मी., उरण-21.00 मि.मी., कर्जत-44.10 मि.मी., खालापूर-36.00 मि.मी., माणगांव-14.00 मि.मी., रोहा-34.00 मि.मी., सुधागड-27.00 मि.मी., तळा-24.00 मि.मी., महाड-10.00 मि.मी., पोलादपूर-26.00 मि.मी., म्हसळा-25.00मि.मी., श्रीवर्धन-14.00 मि.मी., माथेरान-50.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 441.70 मि.मी.इतके असून सरासरी 27.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 66.25मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

             अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :- केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत “ प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना" राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्हयातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.                मत्स्यव्यवसाय विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे--- मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :- गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज निर्मिती केंद्राची स्थापना (हॅचरी), मत्स्यबीज संगोपन तलाव, मत्स्यसंवर्धन तलाव बांधणी, निविष्ठा खर्च, RAS/ बायोफ्लॉक पध्दतीने मत्स्यसंवर्धन, जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन.   सागरी मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :-   सागरी मत्स्यव्यवसाय बाबत सागरी माशांचे मत्स्यबीज केंद्र निर्मिती, मत्स्यबीज संगोपन केंद्र (नर्सरी), खुल्या समुद्रातील पिंज...

हुश्श...रायगडकरांना दिलासा..! जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली

    अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.80 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.50 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.65 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.60 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 80 मि.मी.पावसाची नोंद

      अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 80.28 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 1 हजार 670.06 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 30.00 मि.मी., पेण-80.00 मि.मी., मुरुड-67.00 मि.मी., पनवेल-42.60 मि.मी., उरण-37.00 मि.मी., कर्जत-51.20 मि.मी., खालापूर-47.00 मि.मी., माणगांव-68.00 मि.मी., रोहा-118.20 मि.मी., सुधागड-88.00 मि.मी., तळा-106.00 मि.मी., महाड-147.00 मि.मी., पोलादपूर-126.00 मि.मी., म्हसळा-58.00मि.मी., श्रीवर्धन-40.00 मि.मी., माथेरान-178.40 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 284.40 मि.मी.इतके असून सरासरी 80.28 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 65.39 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000