Posts

निर्मल गणेशोत्सवांतर्गत वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग तहसिलदार कार्यालय व माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आयोजित निर्मल गणेशोत्सवांतर्गत आज दि.26 ऑगस्ट 2022 रोजी माध्यमिक शाळा, वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणपती कसे तयार करावेत, याचे प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. मौजे थळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री.एकनाथ थेरोंडेकर यांनी मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, श्री.विशाल आढाव, श्री.गौरव माळी, तहसील कार्यालय अलिबागचे श्री.पवन मस्के, शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.  या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. याप्रसंगी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचा निर्धार विद्यार्थी व उपस्थितांनी व्यक्त केला. 00000

पी.एम किसान योजना व मतदान ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभा संपन्न

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील नागरिकांमध्ये पी.एम किसान (PM-KISAN) योजना व भारत निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता अलिबाग तालुकत्यातील मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय, कुर्डूस येथे पोयनाड मंडल अधिकारी श्री.निकम व कुर्डूस तलाठी सत्यवान पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना पी.एम किसान (PM-KISAN) योजना, ई-केवायसी करण्याबाबत माहिती दिली. यावेळी भारत निवडणूक आयोगाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत माहिती देवून फॉर्म 6 ब भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी कुर्डूस ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार --सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Image
    अलिबाग,दि.26 (जिमाका):- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री   रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रुपाली पाटील, अलिबाग   सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.   सार्वजनिक बांधमकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पनवेल येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. रायगड जिल्हयातील या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांनी कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदि ठिकाणी जावून र...

जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.26 (जिमाका):-    आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दि.8 मार्च 2022 रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ज्या महिला, संस्था यांनी   महिलांच्या कल्याणाकरिता, विकासाकरिता उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा महिलांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरिता उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्था यांनी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची तसेच नामनिर्देशनाची यापूर्वीची तारीख वाढविली असून आता दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज भरावयाचे आहेत.        त्यासाठी जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी दिलेल्या विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

    अलिबाग,दि.25 (जिमाका):-  कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा, याकरिता राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले.                 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.              यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, महसूल, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, कॉन्ट्रॅक्टर्स आदी उपस्थित होते.              यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, कोणत्याही प...

स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उपलब्ध

  अलिबाग,दि.25 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ रायगड जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग या कार्यालयात उपलब्ध करून दिला आहे.       स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 या चरित्रकोशात मुंबई, ठाणे, पालघर व कुलाबा (आताचा रायगड जिल्हा) या जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकांचा अल्पपरिचय उपलब्ध करुन दिला आहे.        या ग्रंथाच्या विस्तृत प्रस्तावनेत संपादक श्री. भ. ज. कुटे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय चळवळीचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यासाठी जो लढा झाला त्याच्या विचार मंचनाची पार्श्वभूमी असलेल्या मवाळवाद, जहालवाद, क्रांतीवादी विचारसरणी सुधारणावाद, संविधानवाद या तत्वप्रणालीवर चर्चा केली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली उभारलेली स्वातंत्र्यचळवळ, 19 व 20 व्या शतकात उदयास आलेली ब्राम्हणेत्तर चळवळ, कामगार चळवळ, त्यात...

जे.एस.एम.महाविद्यालय अलिबाग येथे युवा महोत्सवाचे आयोजन

         अलिबाग,दि.25 (जिमाका):- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ प्राप्त व्हावे, म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.   त्यानुषंगाने जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग येथे शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वा. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन आले आहे.         या युवा महोत्सवात अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा पोलादपूर, सुधागड या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या दिवशी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा विविध   प्रकारच्या एकूण 32 स्पर्धांमध्ये सहभाग घेतील.      युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,ॲड. गौतम पाटील   यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सिनेदिग्दर्शक अभिषेक जावकर तसेच प्रमुख प...