Posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.6(जिमाका):-  दि. 5 जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, अलिबाग नगरपरिषद, लायन्स क्लब श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा संस्था, आधार फाऊंडेशन, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अलिबाग   समुद्रकिनारा येथे (दि.5 जून रोजी) सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत श्रमदानातून समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली तसेच यावेळी प्रिझम संस्थेच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती देखील करण्यात आली.  सादर केलेल्या पथनाट्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असणारे विविध घटक जसे, की प्लास्टिकचा अतिवापर, अतिशय जास्त वृक्षतोड, वनसंवर्धनाची आवश्यकता यासंदर्भात उत्तमरित्या जनजागृती करण्यात आली. लहानश्या कृतीतून आपण आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो, पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्ष संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी असून आपण सर्वांनी एकत्र येऊ...

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर

    अलिबाग,दि.5जिमाका):-  रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल त.पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, वेदिक ट्री प्री स्कूल करंजाडे, वेद ड्राप पब्लिक स्कूल करंजाडे, से-03, शॉप नं. 56, 87 प्लॉट नं. 60/60A, विनायक आश्रय, करंजाडे पनवेल,  डॉल्फिन किड्स स्कूल, से-3, प्लॉट नं. 59, के.डी.शेल्टर, करंजाडे, ता.पनवेल,  ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल तळोजा, वेदांत पब्लिक स्कूल कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली,  सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल करंजाडे,  एस.जी.टी. इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, वेद गृह इंटरनॅशनल स्कूल करंजाडे,  ओझन्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे,  प्लीजन्ट इंग्लिश स्कूल सांगडे,  एस. बी. पी. इंग्लिश स्कूल शेडुंग,  पायोनियर पब्लिक स्कूल पारगाव,  लिटल चॅम्प ओवळे,  एकलव्य स्कूल ओवळे,  साई गणेश एज्युकेशन सोसायटीची ल...

350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त शिवभक्तांना किल्ले रायगडावर सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी....

जिल्ह्यात मासिक पाळीदिनानिमित्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,दि.25(जिमाका):-  जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची थीम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून दि.22 मे ते दि.28 मे 2023 या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह जिल्ह्यात राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात रॅली, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिक, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे.  या अनुषंगाने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जन...

80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जमा करावी

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील 80 वर्षावरील जे कुटूंब निवृत्ती वेतनधारक रायगड कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांनी अतिरिक्त निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याकरिता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड व पॅनकार्डची आवश्यकता आहे. तरी जिल्ह्यातील 80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जिल्हा कोषागार कार्यालय किंवा नजिकच्या तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात जमा करावी,  असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. ००००००००  

जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  रायगड जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू करण्यात आली आहे. जे निवृत्तीवेतनधारक आयकर कपात पात्र आहेत (ज्यांचे वार्षिक निवृत्तीवेतन रु.सात लाखापेक्षा जास्त अधिक आहे, असे निवृत्तीवेतनधारक) अशा निवृत्तीवेतनधारकांचे नियमानुसार आयकर कपात त्यांच्या निवृत्तीवेतनातून माहे जून 2023 पासून करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.  तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांना जुनी आयकर प्रणाली स्वीकारायची आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी (सन 2023 -24) केलेल्या गुंतवणुकीच्या तपशीलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारण्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरित सादर करावा. अर्ज तपशील सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात निवृत्तीवेतनातून करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी सदरची माहिती  तात्काळ  कोषागार सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. ००००००००

शेतकऱ्यांनी भात बियाणे उगवण क्षमता चाचणी करावी --उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

  अलिबाग,दि.24(जिमाका):-  खरीप हंगामात भात हे पीक महत्त्वाचे आहे. पिकाची उत्पादकता चांगली येण्यासाठी बियाणे हा घटक महत्वाचा आहे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. आपण पेरणीसाठी वापरत असलेल्या बियाण्याची   उगवण क्षमता तपासणे, पेरणीसाठी किती बियाणे वापरावे हे ठरवता येते यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी  करावी.   उगवण क्षमता तपासणी प्रकार  :- वृत्तपत्राच्या किंवा गोणपाटाच्या सहाय्याने- 100 भात बियाणे मोजून घेऊन ते पेपर मध्ये 10 च्या क्रमाने 10 रांगेत ठेवावे व पेपर गुंडाळून त्यावर रबर बँड किंवा भाग्याने बांधावे व त्यावर हलके पाणी शिंपडून ते सर्वसाधारण तापमानात 3-4 दिवस ठेवावे. त्यावर पाणी शिंपडून ओलसरपणा ठेवावा व 3-4 दिवसानंतर त्यास मोड आल्यावर त्यातील किती बियाणे उगवले ते मोजून घ्यावे.   बियाणे पेरणी करून - पसरट भांड्यामध्ये किंवा ट्रे मध्ये माती, शेणखत यांचे योग्य प्रमाण घेऊन 100 भात बियाणे मोजून ते पेरावे व पाणी द्यावे. 5-6 दिवसानंतर त्यातील उगवलेले बियाणे मोजून घ्यावे. 100 बियातील 92 बिया उगवल्या तर 92 टक्के उगवण क्षमता होते.92 टक्के...