80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जमा करावी

 

 

अलिबाग,दि.24(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील 80 वर्षावरील जे कुटूंब निवृत्ती वेतनधारक रायगड कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांनी अतिरिक्त निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याकरिता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड व पॅनकार्डची आवश्यकता आहे.

तरी जिल्ह्यातील 80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जिल्हा कोषागार कार्यालय किंवा नजिकच्या तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.

००००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन