Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध ---महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

रायगड(जिमाका)दि.12:- महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. कुरुळ येथील सुरुची हॉटेल सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ, साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी जि.स.श्रीमती दळवी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यजित बडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे आदि उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने मार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची ...

राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये सुधारणा

रायगड(जिमाका)दि.11:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे दि.28 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकान्वये प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) च्या मार्गदर्शक सुचनानुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी देण्यात येणारी अनुदान रक्कम रु. 10,000/- वरुन रु. 50,000/- करण्यात आली असल्याने राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. 50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 50 हजार, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 50 हजार. महामंडळाचा सहभाग, रु. 10,000/- (अनुदान), प्रकल्प मुल्याच्या 50 टक्के (रु.25,000/-) अनुदान, बँकेचा सहभाग, रु. 40,000/- बँकेचे कर्ज, 50 टक्के (रु.25,000/-) बँकेचे कर्ज, व्याज दर, बँकेच्या नियमाप्रमाणे, परतफेडीचा कालावधी, 3 वर्ष. बीजभांडवल योजना :- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 5 लाख, वाढीव अनुदानानुसार योजना, र...

मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

रायगड(जिमाका)दि.11:- मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखला, शैक्षणिक दाखला, टीसी, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह दि.6 मार्च ते दि.28 मार्च 2024 या कालावधीत विविध नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था, मर्या., सदनिका क्रमांक 2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे,अलिबाग येथे अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे, जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेसाठी निकष व अटी पुढीलप्रमाणे- प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड ...

पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

रायगड,दि.06(जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपक्ष मंगल कार्यालय, 121/बी, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहच...

सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रायगड,दि.05(जिमाका) :- महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. महाड औद्योगिक क्षेत्र येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश बानापुरे,एमआयडीसी चे अभियंता उदय देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाड औद्योगिक क्षेत्रातील नांगलवाडी फाटा ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत-9201.07 लक्ष)शिव मंदिर ते ग.द.आंबेकर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे. (कामाची किंमत-234.85 लक्ष) नांगलवाडी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट काँक्रिट रस्ता व बाजूच्या गटारीचे बांधकाम करणे, (कामाची किंमत-560.44 लक्ष) तसेच रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापु...

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे व परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड,दि.05(जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचा सुशोभिकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधि...

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर

रायगड,दि.05(जिमाका):- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून या अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव यांनी दिली आहे. रायगड जिल्हयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठया प्रमाणावर यशस्वी झाले असून जिल्हयातील 3 हजार 535 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणी सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम जिल्हयातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, व जिल्हा पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले आहे. आयुक्त, शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.03 मार्च 2024 च्या पत्रानुसार मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली...