Posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण

    रायगड , दि. 13  (जिमाका):- भारता च्या 79   व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  शुक्र वार ,   दि. 15 ऑगस्ट   202 5  रोजी  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 0 5 वा.संपन्न होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी होणार असल्याने सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 वाजण्याच्यापूर्वी किंवा 9.35 वाजल्याच्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.              तरी नागरिकांनी ,   प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,   असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

“होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” पदासाठी रोजगाराची सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींनी अर्ज करावेत

           रायगड,(जिमाका)दि.12:-   शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्राईल देशात  “ होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स ”  या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात सुमारे 5000 युवक-युवतींना संधी मिळणार आहे. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींनी अधिक माहिती व नोंदणीसाठी  https:// maharashtrainternational.com  या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावेत असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :- “ होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स ”  सेवांसाठी निपुण/पारंगत,भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (including OJT). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय...

राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी

  रायगड,(जिमाका)दि.12:-   जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणाकरीता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धाही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. जागतिक  कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील  23 वर्षाखालील पात्र  उमेदवारांनी  https://www.skillindiadigital. gov.in ,या लिंकवर भेट देवून दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. त्यानुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करू...

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन

                                                    रायगड (जिमाका)दि.04 :-  वैध मापन शास्त्र, यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहकांच्या तक्रारीचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, रायगड जिल्हा क्रमांक 1 यांच्या वतीने कार्यालय, निरीक्षक वैध मापन शास्त्र, पनवेल नर्मदा कॉम्फ्लेक्स गाळा क्रमांक 34,35, व 36 स्टेशन रोड पनवेल येथे दि.05 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12. 30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपनियंत्रक वैध मापन शास्त्र रायगड जि.क्र.1 संजीव कवरे यांनी दिली आहे.   जनता दरबारामध्ये ग्राहक संघटना, व्यापारी उपयोगकर्ते संघटना, उत्पादक/पॅकर यांना वैध मापन शास्त्र, अधिनियम 2009 व त्या अंतर्गत नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांच्या कांही अडचणी असल्यास त्यांचे निराकरणही करण्यात येईल. जनता दरबारामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी, सुचनाचे निराकरण करण्यासाठी व ता...

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
  रायगड जिमाका,दि.31-- महसूल विभागाच्या वतीने राज्यात एक ऑगस्ट रोजी 'महसूल दिन 'साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा सप्ताह शुक्रवार (दि.1) ते गुरुवार (दि. 7 ऑगस्ट) दरम्यान असणार आहे. या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.  महसूल सप्ताह   1 ऑगस्ट रोजी 'महसूल दिना'निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. 2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. 3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार  'पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना' अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस...

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

      रायगड(जिमाका)दि.29:-   राज्यातील पर्यटन उद्योगाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक   30.04 .२०२५ पासून अंमलात आलेल्या शासन निर्णयानुसार, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील खाजगी आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या पर्यटन विषयक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रतिमानिर्मिती आणि ब्रँडिंगसाठी खास धोरणे अंमलात आणली जात आहेत. या योजनेअंतर्गत स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांना अनुदान व सहकार्य दिले जाणार आहे. यात खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था व अन्य आयोजक समाविष्ट आहेत. पर्यटन व सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, खाद्य महोत्सव, क्राफ्ट व हँडीक्राफ्ट प्रदर्शन, MICE इव्हेंट्स (मीटिंग, प्रेझेंटेशन, एक्झिबिशन), डिजिटल मोहिमा, मीडिया टूर, फॅम टूर, इत्यादी उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. महत्त्वपूर्ण बाबी व उपक्रम पर्यटन क्षेत्रातील ब्रँडिंग: महाराष्ट्र पर्यटन विभाग वार्षिक पर्यटन विपणन आणि ब्रँडिंग योजना तयार करणार असून, त्याअंत...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

    रायगड,दि. 25 (जिमाका):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे.  त्यानुसार  सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड  सर्जेराव सोनावणे  यांनी केले आहे.   शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्तभाव दुकानस्तरावर ई-केवासयी मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाचे निर्देशान्वये धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची  100 टक्के   ई-केवायसी करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये  75 . 72 टक्के   लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थी या...