Posts

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट

Image
एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट             अलिबाग दि.19 :- (जिमाका)  कोकण विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या  एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील वळवली येथील जिल्हा परिषद शाळेस  जिल्हा  परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला.                 यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाटील तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी   मोठया संख्येने उपस्थित होते.                                                    ...

रस्ता सुरक्षा पंधरवडा आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
रस्ता सुरक्षा पंधरवडा आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी  वाहतूक नियमांचे पालन आवश्यक                                           ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.9 (जिमाका)    ) जिल्ह्यात दि.  9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा व अभियान  राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील वाहन चालकांनी वाहतुकींच्या नियमांचे पालन करुन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा जपावी असे आवाहन,  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले  यांनी  येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या पंधरवड्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यावेळी त्या बोलत होत्या.              या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील,  उ प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, आपत्ती व्यव...

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक  आदर्श आचारसंहितेचे पालन करावे                                                        ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.7 (जिमाका)  कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक  कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. कोंकण विभागातील पाच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून  आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी  आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.             यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माणगाव प्रांत.विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते.  कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा  निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्...

आपली सुरक्षा परिवाराची रक्षा रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध उपक्रमांचे आयोजन ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने

Image
आपली सुरक्षा परिवाराची रक्षा रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध उपक्रमांचे आयोजन                                          ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने        अलिबाग दि.7 (जिमाका) जिल्ह्यात दि.  9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियान  राबविण्यात येणार आहे.  या निमित्त रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या पंधरवडा निमित्त होणाऱ्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रस्ता सुरक्षा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन     समिती सचिव तथा उ प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने यांनी केले आहे.             या संदर्भात काल जिल्हाधिकारी...

महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे फायबर ऑप्टीकने जोडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

Image
महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे फायबर ऑप्टीकने जोडणार                                                                                             -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग,दि.02:- महाराष्ट्रात येत्या 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजीटल (फायबर ऑप्टीक) करण्यात येतील. या माध्यमातून सर्व गावे डिजीटल होऊन त्या माध्यमातून जलद विकास आणि सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे शहर आणि ग्रामीण भेद दूर होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज खारघर, नवी मुंबई येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत बांधण...

झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक-- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
 झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक                                 -- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले             अलिबाग दि.29:- (जिमाका)  रायगड जिल्ह्याला झाडे लावण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे व लावलेल्या झाडांचे संगोपन करुन ती झाडे जास्तीत जास्त प्रमाणात जगवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करणे याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या.             या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर ...

ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक                                                       --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.28:- (जिमाका :  ग्राहक म्हणून असलेला आपला हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने सदैव जागरुक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.  या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस.आर.सा...