Posts

जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा - उद्योग मंत्री सुभाष देसाई

Image
जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा                                                                   -   उद्योग मंत्री सुभाष देसाई अलिबाग दि.27 (जिमाका) जेनेरिक औषधांचा वापर हा आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज माणगांव येथे केले. प्रबोधन गोरेगांव ग्राहक संस्था मर्यादित संस्थेच्यावतीने माणगांव येथे सुरु करण्यात आलेल्या रायगड जिल्हयातील जेनेरिक औषध पेढीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.            यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते. मंत्री महोदय पुढे बोलताना म्हणाले की, प्रबोधन औषधपेढी ही महाराष्ट...

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृद्ध आवार

सुधारीत लेख गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृ द्ध आवार आपल्या परिसरातील  धरणांमधून गाळ काढून मागेल त्याला तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही एक महत्वाची  योजना राबविण्यास शासनाने सुरुवात केली  आहे. या उपयुक्त अशा योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे 50%  पर्यंत घट होणार असून दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अगदी दुहेरी लाभाची ही योजना असून यामुळे आपला परिसर,आपले शेत समृद्ध होऊ शकेल अशी ही योजना आहे.शेतकऱ्यांना एका अर्थाने आर्थिक सक्षम करण्याऱ्या योजनेची ही थोडक्यात माहिती….             देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त धरणे आहेत. हे आपल्याला माहितच असेल.मुबलक पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरणांमध्ये आता काही प्रमाणात गाळ साचला आहे. जर हा गाळ उपसा निघाला तर नक्कीच पाणी साठवण वाढेल, शिवाय धरणातील हा गाळ शेतात पसरविल्यास कृषी उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याचा ...

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृद्ध आवार

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृ द्ध आवार आपल्या परिसरातील  धरणांमधून गाळ काढून मागेल त्याला तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही एक महत्वाची  योजना राबविण्यास शासनाने सुरुवात केली  आहे. या उपयुक्त अशा योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे 50%  पर्यंत घट होणार असून दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अगदी दुहेरी लाभाची ही योजना असून यामुळे आपला परिसर,आपले शेत समृद्ध होऊ शकेल अशी ही योजना आहे.शेतकऱ्यांना एका अर्थाने आर्थिक सक्षम करण्याऱ्या योजनेची ही थोडक्यात माहिती….             देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त धरणे आहेत. हे आपल्याला माहितच असेल.मुबलक पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरणांमध्ये आता काही प्रमाणात गाळ साचला आहे. जर हा गाळ उपसा निघाला तर नक्कीच पाणी साठवण वाढेल, शिवाय धरणातील हा गाळ शेतात पसरविल्यास कृषी उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याचा लाभ होऊ शकेल. ...

वयोवृद्ध खेळाडूंना मानधन संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

वयोवृ द्ध खेळाडूंना मानधन संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन अलिबाग,दि.25:-(जिमाका)- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडूंना त्यांच्या वृद्धापकाळात वित्तीय सहाय्य मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्यामार्फत सन 2017-18  या वर्षाकरिता वयोवृद्ध खेळाडूंना मानधन ही योजना सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यातील संबंधित खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी याबाबतचे   प्रस्ताव द्यावेत तसेच या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 00000000

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 2 जुनला बैठक प्रस्ताव -तक्रारी सादर करण्याचे आवाहन

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 2 जुनला बैठक प्रस्ताव -तक्रारी सादर करण्याचे आवाहन अलिबाग,दि.25:-(जिमाका)- भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली परिपत्रकान्वये वासुदेव जी.गोरडे (भा.प्र.से.) सेवा निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यांत आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. सदर समितीची दुसरी बैठक 2 जून 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.) विश्रामगृह दस्तुरी माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.04 फेब्रुवारी 2003 च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गांवाचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यांत आला आहे.यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुर्ण  1 व भागत: 19, एकूण- 20,खालापूर तालुक्यातील भागत: 10,पनवेल तालुक्यातील पुर्ण 2 व भागत: 38, एकूण- 40,आणि ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुक्यातील भागत: 19,अशा एकूण 89 गांवांचा प्रदेश समाविष्ट आह...

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

उ द्यो ग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा  दौरा कार्यक्रम अलिबाग,दि.25:- (जिमाका)- उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई  हे दिनांक 26 मे 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.26 मे 2017 रोजी दुपारी 2.00 वाजता मुंबईहून मोटारीने माणगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 माणगांव येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.27 मे 2017 सकाळी 10.00 वाजता प्रबोधन गोरेगांव ग्राहक सहकारी संस्थेच्या 10 व्या जेनेरिक औषधपेढीचे उदघाटन. सकाळी 11.00 वाजता माणगांव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 0000000

इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक बोटीची नोंदणी आवश्यक --प्रादेशिक बंदर अधिकारी

इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक                                         --प्रादेशिक बंदर अधिकारी अलिबाग,दि.25:-(जिमाका)-प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसई, धरमतर, उल्वा, बेलापूर, ट्रॉम्बे,कल्याण-भिवंडी, मांडवा, करंजा, मोरा व तापोळा डॅम येथील जलयान मालकांनी इनलॅण्ड् व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक असल्याचे परिपत्रक कॅप्टन विनायक इंगळे, प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांनी जारी केले आहे. या परिपत्रकात असेही म्हंटले आहे की,ज्या यांत्रिक जलयानांची नोंदणी Identification Number (ओळख क्रमांक) अंतर्गत करण्यात आलेली आहे. अशा सर्व जलयान मालकांना आय.डी.अंतर्गत नोंदणी असलेल्या यांत्रिक जलयानांच्या नोदणीस महालेखाकार (लेखापरिक्षा), मुंबई यांनी आक्षेप घेतल्यामुळे व मुख्य कार्यकारी...