Posts

जून मध्ये 2 लाख 83 हजार ध्वजदिन निधी संकलन

जून मध्ये 2 लाख 83 हजार ध्वजदिन निधी संकलन अलिबाग दि.7,(जिमाका):- माजी सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अंतर्गत रायगड जिल्हयात जून-2017 मध्ये रुपये 2 लाख 83 हजार 627 रुपये इतका ध्वजदिन निधी  संकलित करण्यात आला आहे.  मागील महिन्याच्या अखेर झालेला संकलन निधी 16  लाख 44 हजार 972 रुपये असा एकूण  19लाख 28 हजार  599 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे.  त्याची टक्केवारी 35.42 इतकी आहे.    जिल्हयाला या वर्षासाठी रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 000

जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद

   जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद         अलिबाग दि.7,(जिमाका):- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1076.73 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 03.00 मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-27.40 मि.मि., उरण-30.00 मि.मि., कर्जत-25.40 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-41.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-21.00 मि.मि., तळा-46.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-47.60 मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-26.60 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 454.20 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  34.26 % इतकी आहे. 00000

राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्यातील कलावंतांना चांगल, हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देणं हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन  राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. अलिबाग शहरात  पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील  पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. बाळाराम पाटील, श्रीमती मिनाक्षीताई पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, श्रीमती नलीनी , पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, पोलीस अधिक्षक अ...

मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिपॅडवर स्वागत

Image
अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10 वा.50 मि. नी  डोलवी ता. पेण येथील जेएसडब्ल्यू  या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचेसमवेत राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे हे उपस्थित होते. हेलिपॅडवर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी  त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ००००

अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध

     अलिबाग दि.6 (जिमाका):- गट क व ड संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर, नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात तसेच  www.raigad.gov.in  या जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रतिक्षा यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत,आक्षेप असल्यास,उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेमार्फत आपले हरकत अर्ज दि.25 जुलै पर्यंत नोंदवावी. मुदतीनंतर आलेले  आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी कळविले आहे.     00000

जिल्ह्यात एकूण 1048 मि.मि. पावसाची नोंद

        अलिबाग दि.6,(जिमाका)- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1048.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 02.00 मि.मि., पेण-06.00 मि.मि., मुरुड-1.00 मि.मि., पनवेल-5.60 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-22.20 मि.मि., खालापूर-14.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-06.00 मि.मि., सुधागड-11.00 मि.मि., तळा-04.00 मि.मि., महाड-14.00 मि.मि., पोलादपूर-08.00, म्हसळा-04.00 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-21.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 128.30 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी 33.36 % इतकी आहे. 00000

जिल्ह्यातील प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन मार्ग काढणार- ना. प्रकाश महेता

Image
अलिबाग,दि.6,(जिमाका)- रायग्ड जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन्माननीय सदस्यांनी चर्चा केली. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रालयस्तरावर संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज पत्रकारांना दिली.             जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते  उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत  जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ना. महेता म्हणाले की,  यंदा प्रथमच जिल्ह्यात 99.9 टक्के मंजूर नियतव्यय खर्च झाला आहे.  त्यामुळे विकासकामांना गती आली.  रायगड जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठि जिल्ह्यात शौचालय बांधकाम पुर्ण करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येईल.      ...