Posts

रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी श्री.मनोज शिवाजी सानप रुजू

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : श्री.मनोज शिवाजी सानप   यांची जिल्हा माहिती रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी दि.20 मार्च 2020 रोजी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.   संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्र.8169519683/8108102656 तसेच व्हॉटसअप क्र.9503546004 आहे.   तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती   कार्यालयाने केले आहे. 00000

जिल्हा माहिती कार्यालय, नियोजन भवन मध्ये स्थलांतरित

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग, पाध्येवाडी, नवरे इमारत, बँक ऑफ इंडिया शाखा, अलिबाग समोर येथे कार्यरत होते.   आता दि. 21 मार्च 2020 पासून जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, या ठिकाणी स्थलांतरित   झाले आहे.   तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती   कार्यालयाने केले आहे. 00000

सलग उत्पादन प्रक्रिया चालू असणाऱ्या कंपन्या,पेट्रोल पंप, इंधन तेल कंपनी व त्यांची गोदामे सुरु ठेवण्यास मुभा

अलिबाग,दि.25(जिमाका)-   शासनाने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च, 2020 लागू केला आहे.          करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शासन निर्देशाप्रमाणे औद्योगिक व खाजगी आस्थापनांमधील होणारी गर्दी टाळण्यासाठी औद्योगिक व खाजगी आस्थापना दि.14 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.           या आदेशान्वये खाद्यपदार्थ, औषधे वैद्यकीय उपकरणे, सलग उत्पादन प्रक्रिया चालू असणाऱ्या कंपन्या, पेट्रोल पंप, इंधन तेल कंपनी व त्यांची गोदामे चालू राहणार आहेत.दि.14 एप्रिल 2020 पर्यंत बंद असणाऱ्या औद्योगिक कंपन्यामधील व पेट्रोलियम पदार्थ, कच्चे खनिज तेल साठवणूक करणाऱ्या गोदामांमधील यंत्र सामुग्री दुरुस्ती व देखभाल कंपनी परिसरात रखवाली व साफसफाई करण्यासाठी कमीत कमी वाहने व ५०% किंवा त्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये प्रवेश देण्यास या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनान...

रायगडमधील करोनाग्रस्त एका व्यक्तीचा रिपोर्ट "निगेटिव्ह", रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी सदैव सज्ज -- पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग,दि.25(जिमाका)- करोना विषाणूबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील करोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट आज निगेटीव्ह आल्याने त्या व्यक्तीला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.       परदेशवारी करून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून करोनाची लागण झाल्याने त्यावर मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला सुरूवातीला मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या करोनाबाधित व्यक्तीवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे आज त्याचे सॅम्पल रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर एका करोनाबाधित व्यक्तीवर कस्तुरबा स्पिटलमधील विलगीकरण कक्षात अजूनही उपचार सुरू असून ती व्यक्ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे.     या दरम्यान एक व्यक्ती करोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना विषाणू संसर्गित व्यक्तींची संख्या ही बाब चिंताजनक आहे.             नागरिकांनी शा...

अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन

अलिबाग,दि.25(जिमाका)- सध्या जगात/देशात/राज्यात करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.               या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलीस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता), अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.                 तरी संबंधितांना काही अडचणी आल्यास त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, यासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५(टोल फ्री) व   ०२२-२६५९२३६२/६३ हे आहेत. 000000

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकी व्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी जिल्ह्याच्या सीमा बंद -जिल्हाधिकारी निधी चौधरी

            अलिबाग,दि.25(जिमाका)-   करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत.              या अधिसूचनेद्वारे सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवा (खाजगी वाहनांसह) त्यामध्ये खाजगी चालकांकडून केली जाणारी वाहतूक सेवा निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.              त्यानुसार महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 नुसार प्राप्त अधिकारातून करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.24 मार्च 2020 रोजी रात्री 9.00 पासून पुढील आदेश होईपर...

“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या ! 1 ते 24 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग,दि.25(जिमाका)-    जे नागरीक   दि.1 ते 23 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले नागरीक-1065, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरीक-250, घरामध्ये अलगीकरणात (Home Qurantine) असलेले नागरीक-717, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Qurantine) असलेले नागरीक-96. मुंबई येथील भाभा हॉस्पिटल मध्ये दाखल नागरीक-01 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे तर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-1 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. परदेशी प्रवास करुन परतलेल्या नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-26, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-8...