Posts

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा  रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 06.00 वा. जेतवन शासकीय निवासस्थान, मुंबई येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. श्रीवर्धन येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठक. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. शासकीय वाहनाने श्रीवर्धन येथून गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहाकडे प्रयाण.  दुपारी 1.45 वा. गिताबाग सुतारवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. 0000000

उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) मा.ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. गिताबाग, रोहा येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन येथे आगमन. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण भूमीपूजन सोहळा. सकाळी 10.30 वा.   रायगड जिल्हयातील कोविड-19 या रोगाच्या साथीच्या व तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.15 वा. श्रीवर्धन येथून मोटारीने प्रयाण गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहा   येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. 0000000

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत आज (दि.3 जून) रोजी अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे HB, BP,ऑक्सिजन, व अँटीजन टेस्ट अशा विविध प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.     या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 37 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.       यावेळी   गटाविकास अधिकारी सौ.दिप्ती पाटील, सहायक गटविकास अधिकारी श्री.चौलकर, श्री. मंगेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेविका, आरोग्य केंद्रातील डॉक्टर,स्टाफ सीआरपी ताई आणि प्रभाग समन्वयक अमोल माळी उपस्थित होते. 0000000

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीमध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्रामध्ये अलिबाग गटविकास अधिकारी सौ. दीप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला महासमृद्धी अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांसाठी काल (दि. 02 जून) रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात उपस्थित महिलांची ऑक्सिजन लेवल, रक्तदाब आणि अॅंटीजेन तपासणी करण्यात आली.   यावेळी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिराकरिता ग्रामपंचायत शहापूर सरपंच महेंद्र कृष्णा पाटील, आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता युगेश पाटील, आरोग्य सेविका समिधा संतोष खोत, आरोग्य सेवक के. एस. झेमसे तसेच आशा सेविका, सीआरपी विजया सतीश भगत, ग्रामसंघ अध्यक्ष मंदा नंदकुमार पाटील आणि   प्रभाग समन्वयक साईनाथ पाटील उपस्थित होते. ००००००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- गुरुवार दि.03 जून 2021 रोजी सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.             शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून मा.उपमुख्यमंत्री अजित पवार   यांच्यासमवेत श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन व मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत श्रीवर्धन नगरपरिषद आयोजित पाणीपुरवठा योजना व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत तौक्ते चक्रीवादळ, कोविड-19 व नगरपरिषद विकासकामांच्या   आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, श्रीवर्धन. सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ : उपविभागीय अधिक...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.39 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 40.94   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.               आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 0.00 मि.मी., पेण- 28.00 मि.मी., मुरुड- 0.00 मि.मी., पनवेल- 12.60 मि.मी., उरण- 0.00 मि.मी., कर्जत- 11.60 मि.मी., खालापूर- 18.00 मि.मी., माणगाव- 6.00 मि.मी., रोहा-16.00 मि.मी., सुधागड-12.0 मि.मी., तळा- 8.0 मि.मी., महाड-4.0 मि.मी., पोलादपूर- 1.00 मि.मी, म्हसळा- 1.00 मि.मी., श्रीवर्धन- 0.0 मि.मी., माथेरान- 64.00 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 182.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 11.39 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 1.30 टक्के इतकी आहे. 00000  

केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत “संवेदना” दूरध्वनीद्वारे कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना समुपदेशन 1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावरुन कोविड-19 मुळे तणावग्रस्त असलेल्या मुलांना दिला जातो मानसिक आधार

    अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका) : कोविड-19 मुळे प्रभावित   मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना   (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत   संवेदनशील कृती) दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ही एक वैधानिक संस्था असून महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा.डॉ.शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून हे समुपदेशन दिले जात आहे. महामारीच्या संकटात तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा   आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते श...