Posts

जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी वृत्तपत्रात खाद्यपदार्थ न देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग , दि. 17 ( जिमाका):- जिल्ह्यातील हॉटेल्स , बेकरी , स्नॅक्स सेंटर , स्वीटमार्ट , वडापाव , भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित , सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्नपदार्थ गुंडाळून/बांधून ग्राहकांना देण्याची प्रथा सर्रास दिसून येते. परंतू वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल / घातक रंग असल्याने गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण , नवी दिल्ली यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग क...

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

अलिबाग , दि.17 (जिमाका):- रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक दि.15 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघातांची कारणे शोधणे व ती कमी करणे , ब्लॅक स्पॉट ची यादी तयार करणे व ब्लॅक स्पॉट कमी करण्याबाबत कारवाई करणे, जिल्ह्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत वर नियंत्रण ठेवणे इत्यादी सह विविध विभागांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. होळी सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात येतात ,   त्यांना प्रवासामध्ये त्रास होऊ नये , यासाठी विविध विभागांनी समन्वय ठेवून तातडीने रस्ता दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी रस्त्यावरील सर्व प्रकारचे फलक व रस्त्यावरील रेषा या   रस्त्यावरील अपघात कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, याची दुरुस्ती व देखभाल   करण्याबाबत...

रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम रद्द - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  अलिबाग , दि.17 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील मुदत संपलेल्या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र , महाराष्ट्र अधिनियम 21 अन्वये महानगरपालिका , नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या क्षेत्रांची विभागणी करण्याची व हद्द विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया नवीन तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांतील सदस्य पदांच्या निवडणुकीसाठीचा प्रभाग रचना कार्यक्रम 2022 ची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.15 मार्च 2022 रोजी जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या दि.22 फेब्रुवारी 2022 च्या आदेशानुसार एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत राज्यातील मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा राज्यातील एकूण 208 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम 2022 जाहीर झाला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोली , अलिबाग , महाड , माथेरान , मुरुड जंजिरा , पेण , रोहा , श्रीवर्धन व उर...

Eat Right India कार्यक्रमांतर्गत खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी Hygiene Rating व Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग , दि. 17 ( जिमाका):- रायगड जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी , दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापना चालकांनी आपल्या व्यवसायानुसार Hygiene Rating / Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घ्यावे. त्यानुषंगाने काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन , महाराष्ट्र राज्य , रायगड-पेण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित , सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या Eat Right India या कार्यक्रमांतर्गत Hygiene Rating या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी , दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनांनी मानांकन प्राप्त करून घेतले आहे. ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे रायगड येथे टाऊन हॉल मीटिंग संपन्न

अलिबाग, दि.15 (जिमाका):- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील MSME उद्योजकांसाठी सोमवार, दि.14 मार्च 2022 रोजी एक टाऊन हॉल मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने गणपती मूर्ती बनविणे आणि पापड बनविणे ही कामे करणारे उद्योजक सहभागी झाले होते. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील एमएसएमई उद्योजकांना बँकिंग वाहिनीच्या कक्षेत आणणे आणि गणपती मूर्ती तसेच पापड बनविणाऱ्या कारागिरांना आर्थिक जोड देण्याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा टाऊनहॉल सभेचा मुख्य हेतू होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी FIDD, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे या होत्या तर बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शम्पा बिस्वास, बँक ऑफ बडोदाचे उप.झोनल मॅनेजर श्री.हेमंत कृ.लाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, आरएसईटीआय चे संचालक श्री.आनंद राठोड आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजय कृ.कुलकर्णी,उमेद अभियाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ हे या बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग, दि.15 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील कुशल / अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि.17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment Job Seeker (Find a Job) Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या वेब ...

जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

अलिबाग, दि.15 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत  “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ”  च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे वेबपोर्टल  https://rojgar.mahaswayam.gov. in  वर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job) Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details Job Details Agree and Post Vacancy Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक्तपदांची...