Posts

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग, दि.29 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: सकाळी 8:10 वाजता  “ मुक्तागिरी ”  बंगला, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता गेट वे ऑफ इंडिया (गेट नं. 4) येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9 वाजता बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड येथे आगमन व मोटारीने आक्षी, ता.अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता मराठी भाषा आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: ग्रामपंचायत आक्षी, ता.अलिबाग). सकाळी 9:50 वाजता आक्षी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादन संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 10:30 वाजता आंबेत पूल संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता द...

मत्स्यव्यवसायाशी निगडित समस्यांवर उपाययोजना सुचविण्याकरिता सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्याबाबत शासन निर्णय जारी

Image
  अलिबाग, दि.28 (जिमाका):-  राज्यामध्ये भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठी फार मोठा वाव असून या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्याची क्षमता आहे. राज्यात प्रथिने उपलब्धता व्हावी, मत्स्य दरडोई उत्पन्न वाढविणे यासाठी मत्स्योत्पादन वाढविण्यास राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर भूजल / निमखारे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात येणारी नवीन आव्हाने, निर्माण होणाऱ्या अडीअडचणी/समस्या, मत्स्यउपादन वाढविणे, मच्छिमारांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होणे, मत्स्यव्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी / विविध मुद्दे इत्यादी बाबींवर उपाययोजना करून समस्यांचे निवारण करण्याकरिता शासनाने सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याबाबत मान्यता दिली आहे. मत्स्यव्यवसाय हे अनेक मच्छिमारांसाठी उत्पन्नाचे आणि रोजगाराचे साधन म्हणून काम करते. राज्य शासनामार्फत मत्स्यव्यवसाय क्षेत्राला विकसित करण्याच्या दृष्टीने नविन निर्माण झालेल्या तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करणे, पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन करणे, मत्स्यखाद्य निर्मिती कारखाना, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यबोट...

जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार “जनता दरबार”

  अलिबाग, दि.27 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या सूचनेनुसार सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहणार असून जनता दरबाराकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेवून त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे या  “ जनता दरबार ” चे आयोजन नियमितपणे केले जाणार आहे. तरी नागरिकांनी सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे. 00000

पालकांकडून अर्भकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनास यश -उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील

Image
  अलिबाग, दि.21 (जिमाका):-  एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलांना समुपदेशन व योग्य एआरटी औषधोपचार व बालकांना नेव्हीरपीन सिरप देऊन बालकांना होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊन बालकांच्या व महिलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होऊन त्या सर्वांना जीवन जगण्याचे बळ मिळते. पालकांकडून अर्भकाला होणार एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनाचे काम समाधानकारक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी नुकतेच येथे केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय या विभागाची जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समितीची, जीपा व एएमटीसीटी याबाबतची सन 2022-23 मधील प्रथम व द्वितीय सत्राच्या त्रैमासिक आढावा सभा रायगड जिल्हाधिकारी बैठक सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, जिल्हा ...

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना पनवेल मिशन वात्सल्य समितीकडून दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे वाटप

Image
  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  कोविड-19 मुळे आई-वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या चार अनाथ बालकांपैकी अनिकेत बाबू दडस (वय 17 वर्षे), स्वर्णिम अश्विन काकडे (वय 4 वर्षे) या दोन अनाथ बालकांना जिल्हाधिकारी तथा मिशन वात्सल्य समिती, रायगड चे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती पनवेल, ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्र, रोटरी क्लब, हिंदाल्को कंपनी, युवा स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत दिवाळी सणानिमित्त मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप तहसिल कार्यालयात तहसिलदार तथा पनवेल मिशन वात्सल्य समितीचे अध्यक्ष विजय तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी राज कृष्णा पाटील (वय 15 वर्ष), सलोनी कृष्णा पाटील (वय 13 वर्षे) ही अनाथ भावंडे तहसिल कार्यालयात उपस्थित राहू न शकल्यामुळे मिशन वात्सल्य समिती पनवेल यांनी याची दखल घेत त्यांच्या घरी जावून मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.चेतन गायकवाड. विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली वैदू, हिंदाल्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.लहू रौंधाल, ग्राम स्वरा...

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,दि.20(जिमाका):-  खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.21 ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसते. या बाबीचा विचार करता, पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि.10 नोव्हेंबर, 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी याची नोंद घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा 7/12, चालू बँक खाते व स्पष्ट दिसणारे आधारकार्ड यासह आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता खरेदी केंद्रावर स्वत: येवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पणन अधिकारी केशव ताटे यांनी केले आहे. 00000

भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार आत्मनिर्भर -महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या

  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, मुंबई तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे दिव्यांगांकरिता एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, अलिबाग येथे दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. या प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण प्रसंगी भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले. भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड मुंबई द्वारा उदया प्रकल्पांतर्गत अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाच्या विविध संधींची ओळख, संवाद कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय कर्ज योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, क्षेत्र भेट,...