किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार
अलिबाग , दि.5 ( जिमाका):- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यां च्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी , रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2022-2023 करिता धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील दि.19 ऑक्टोबर 2022 शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगामाचा कालावधी दि.19 ऑक्टोबर 2022 ते दि. 31 जानेवारी 2023 असा असेल. तर रब्बी/उन्हाळी हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील . भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7 / 12 चा उता ऱ्या ची व गाव नमुना 8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र...