Posts

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचा पथनाट्याच्या माध्यमातून लोकजागर

Image
  अलिबाग,दि.25(जिमाका):-  जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा माहिती कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तहसिलदार विजय तळेकर आणि तहसील कार्यालय,पनवेल यांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या रमाई आवास घरकुल योजना, स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना यांसह विविध योजनांची जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील पळस्पे, खांदा कॉलनी, विचुंबे, कुंडेवहाळ या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.     खांदा कॉलनी येथील कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता निवडणूक नायब तहसिलदार श्री.नाईक यांनी सहकार्य केले तसेच विचुंबे येथील कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रमोद शांताराम भिंगार...

रेवदंडा-साळाव पुलावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी

  अलिबाग,दि.25 (जिमाका):- अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता रेवदंडा-साळाव पुलावरून 5 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.      त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या दि.3 मार्च 2023 च्या पत्रान्वये अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ- नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळा व मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड - रोहा - तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रो हा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड - साळाव - तळेखार - चणेरा - रोहा -कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग अथवा मुरुड - साळाव - तळेखार - रोहा - कोलाड - नागोठ...

सूक्ष्म व लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार-2022 पात्र उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन

    अलिबाग,दि.25(जिमाका):-  सूक्ष्म लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी, यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने शासनाने 1985 या वर्षीपासून जिल्हा पुरस्कार योजना कार्यरत केली आहे.  हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये पात्र सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या सूक्ष्म लघु उद्योजकांनी विहित अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, ई-मेल आयडी  didicraigad@gmail.com ,  अलिबाग येथे सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी व्यवस्थापक  श्री.एस.यू चकोर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळया  यांनी केले आहे.       शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विजेत्या उद्योजकांची, घटकांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या उद्योजकांना प्रथम पारितोषिक रुपये 15 हज...

किल्ले रायगड येथे 5 व 6 एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता शिवभक्तांनी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

    अलिबाग,दि.24 (जिमाका):-   छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.6 एप्रिल 2022 रोजी 343 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.5 व 6 एप्रिल 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:- बुधवार दि.5 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना,  रात्रौ 8.30 वाजता पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), रात्रौ 9.30 वाजता शाहिरी कार्यक्रम  “ ही रात्र शाहिर...

शेतीला शाश्वत सिंचनाची हमी देणारी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना

    राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त    शेती ही पावसावर अवंलबून असणारी कोरडवाहू शेती आहे. पावसाची अनिश्चितता यामुळे सिंचनाअभावी कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. तर काही वेळा प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नुकसान होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी साठवून   त्याद्वारे सिंचनाची शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अनुदान तत्वावर  “ मागेल त्याला शेततळे ”  ही योजना    सुरु केली आहे .       शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या क्रय शक्तीचा विचार करता शेततळे खोदण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करुन वैयक्तिक शेततळ्यांचा या योजनेत समावेश केला आहे.                  लाभार्थी पात्रता–  अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान ...

आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या कामास सुरुवात

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) आदर्श शाळा टप्पा 2 अंतर्गत मागील दोन दिवसात सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच्छापूर येथे 100 टक्के आदिवासीबहुल शाळेत किरकोळ दुरूस्ती व बोअरवेल पाईपलाईन शाळेपर्यंत आणण्याचे काम गावातील गावकऱ्यांकडून श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात येत असून हे गावाचे एकजूटीचे  प्रतिक आहे.   या कामांसाठी जिल्हा परिषद रायगड-अलिबाग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक गण व शिक्षणाची जाणीव असणारी जागरूक शिक्षण समिती आणि  पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) जिल्हा समन्वयक श्री. रत्नशेखर गजभिये यांनी दिली आहे. ०००००००

श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटलचा लोककल्याणकारी उपक्रम पाली-परळी येथे 39 बेड्सच्या अत्याधुनिक रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ संपन्न

  अलिबाग,दि.24(जिमाका):- श्रीमद् राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरचे प्रणेते परमपूज्य पप्पाजी यांच्या निष्काम करूणेतून समाज कल्याणार्थ श्रीराज मेडिकल अँड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटल (एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्ट) च्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालयाच्या वास्तूचा भूमीपूजन समारंभ गुरुवारी (दि.23 मार्च) रोजी संपन्न झाला. 39 बेड्स असलेल्या या रुग्णालयाचे भूमीपूजन श्री. निलेश मेहता यांच्या हस्ते पाली तालुक्यातील परळी येथे करण्यात आले. यावेळी एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी नितीन अजमेरा, हितेन ठक्कर, श्रीमद राजचंद्र आश्रमचे सर्व ट्रस्टी तसेच सुधागड-पालीचे तहसिलदार उत्तम कुंभार, परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे, पांडुरंग झोरे व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश मेहता म्हणाले की, श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटरच्या आरोग्य सुविधांची तुम्हाला गरज पडेल अशी वेळच यायला नको. परंतु आवश्यकता पडलीच तर कुटुंबियांना रुग्णाला घेवून शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, इतके हे रुग्णालय सक्...