Posts

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका स्थापनेबाबत अलिबाग व मुरुड येथे कार्यक्रम संपन्न

  अलिबाग (जिमाका), दि. 11 :-  महाराष्ट्रातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. राज्यातील मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज असून त्या दृष्टीने कृत्रिक भित्तीकांची पाखरण करणे हा एक प्रभावी उपाय वाटतो. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) स्थापनेबाबत 6 ऑगस्ट    2023 रोजी अलिबाग    व मुरुड तालुका येथे    व 7 ऑगस्ट 2023 रोजी श्रीवर्धन येथे कृत्रिम भित्तीका उभारण्यासाठी मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला वरील तालुक्यातील नौका मालक, तांडेल, खलाशी व संस्था पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मच्छिमारांना कृत्रिम भित्तिकांची उभारणी करण्यासाठी समुद्रातील योग्य जागा निवड करण्यासाठी या कार्यक्रमांमुळे सुकर जाईल, असे जाणवले. कारण त्यांनी    कार्यक्रमात अनेक प्रश्न    विचारुन कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) या शास्त्रीय संकल्...

जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि कलाशिक्षण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी “अभिव्यक्ती मताची” स्पर्धेचे आयोजन

  अलिबाग (जिमाका),दि.11 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मुख्य् निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  “ अभिव्यक्ती मताची ”  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  “ अभिव्यक्ती मताची ”  या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या (मास मिडिया व जर्नालिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी 01 ऑगस्ट् ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीन ही स्पर्धांचे विषय आणि नियम मुख्य् निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या  ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सदर स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:- युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकारी लोकशाहीचा    स्तंभ,एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका/जबाबदारी , लोकशाहीतील सर्व समावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. सदर स्...

बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कारांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले

  अलिबाग(जिमाका),दि.11 :-  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बालशक्ती पुरस्कार सन 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे  www.awards.gov.in  ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थ्ळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31.08.2023 पर्यंत आहे. बाल शक्ती पुरस्कार हा ज्या वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (वैयक्तिक पुरस्कार) हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (संस्था स्तरावर) हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्म्म कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर...

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन

    अलिबाग,दि.11(जिमाका):-    राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण नुसार, भारतात प्रौढांमध्ये (15-49 वर्षे ) एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान 21.6 टक्के महिलांमध्ये आणि 30.7 टक्के पुरुषांमध्ये आहे.    त्यामुळे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे निमित्त साधून जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे, विशेषतः तरुणांमध्ये एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान सुधारण्याकरिता आयोजन केले.        युवा वर्ग हा    एचआयव्ही एड्स अनुषंगाने अतंत्य संवेदनशील असून युवा वर्गात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर    एचआयव्ही/ एड्स जनजागृती होण्याच्या    दृष्टीने रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत रेड रिबन क्लब असलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील गटाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.       रेड रिबन क्लब द्वारे तरुणांमध्ये एचआयव्ही आणि एड्सबाबत जागरूकता वाढविण्यासाठी   मास मीडिया   ही लोकप्र...

महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.11:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.00 वाजेपर्यंत गांधी मेमोरियल हॉल ” , निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव या ठिकाणी जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.              जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  सदर रोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. सदरच्या पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार महिलांसाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्य...

महाज्योती तर्फे पी.एच.डी.संशोधकांना 24 कोटी वितरीत पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,दि.10(जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ,   नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग ,   विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी . एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे ,   त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी ,  त्यांचा विकास व्हावा   या हेतूने पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत दिल्या जात असलेल्या अधिछात्रवृत्तीने विद्यार्थ्यांना निश्चिंत होऊन संशोधन कार्य करता येते. संशोधनासाठी लागत असलेले संदर्भ ग्रंथ घेता येतात. अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात. आज या अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊन विद्यार्थी संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यापीठात शिकवत आहे. आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे करिअर घडवीत आहे. वर्ष 2021 मधे ...

सहकार विभागातील सरळ सेवा पदभरतीच्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा

    अलिबाग,दि10 (जिमाका):-  सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.06 जुलै 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.या कंपनीमार्फत सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 आणि बुधवार दि.16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग प्रमोद जगताप यांनी कळविले आहे. या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या  https://sahakarayukta. maharashtra.gov.in , या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी  https://sahakarayukta. maharashtra.gov.in , या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परोक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन क...