Posts

स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान सीएसआयआर-सीआरआरआय महामार्ग बांधणीसाठी विकसित केलेले मजबूत आणि पर्यावरणास अनुकूल असे तंत्रज्ञान -- सदस्य निती आयोग डॉ.व्ही.के.सारस्वत.

Image
              रायगड,दि.13 (जिमाका) :- "स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान हे CSIR- सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया द्वारे विकसित केलेले तंत्रज्ञान आहे, जे स्टील उद्योगातील वेस्ट चे वेल्थ मध्ये परिवर्तन करत आहे व हे तंत्रज्ञान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास संपूर्ण देशात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात मदत करेल, असे प्रतिपादन सदस्य निती आयोग   डॉ.व्ही.के. सारस्वत यांनी आज येथे केले. NH-66 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड सेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी वेळी ते बोलत होते.                यावेळी मुख्य महाव्यवस्थापक तथा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुंबई अंशुमाली श्रीवास्तव, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जी.एस.राठोड, प्रकल्प संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ, सीएसआयआर-सीआरआरआय सतीश पांडे, सीएसआयआर-सीआरआरआय संचालक डॉ.मनोरं...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन घ्यावी

  रायगड,दि.09(जिमाका) :-   पी.एम.किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्या त  वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता  योजनेचा 16 वा हप्ता वितरणापूर्वी  शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी.एम.किसान योजनेच्या निकषांच्या अधिन राहून योजनेच्या लाभासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक बाबींची पूर्तता घ्यावी, असे  आवाहन  कृ षी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय  पुणे  दिलीप झेंडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  (PM KISAN)  योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुं बास ( पती ,  पत्नी व त्यांची  18  वर्षाखालील अपत्ये) रु.  2000/-  प्रती हप्ता या प्रमाणे  तीन समान  हप्त्यात प्रती वर्षी रू.  6000/-  लाभ  अदा करण्यात येत   आहे.  लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग...

पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन

रायगड,दि.09(जिमाका) :-   सोमवार,  दि. 22 जानेवारी 2024   रोजी ,  दुपारी   15.00   वा.  पोस्ट मास्टर जनरल ,  नवी मुंबई रिजन ,  2 रा माळा ,  पनवेल मुख्य डाकघर   यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  अधीक्षक डाकघर ,  रायगड विभाग अलिबाग सुनिल थळकर यांनी दिली आहे.                    नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झाले नाही ,  अशा टपाल ,  स्पीडपोस्ट ,  काऊटर सेवा ,  बचत बँक ,  मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.    तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक ,  ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत    पोस्ट मास्टर जनरल ,  नवी मुंबई रिजन ,  2 रा माळा ,  पनवेल मुख्य डाकघर  यांच्याकडे दि.   15 जानेवारी ...

जिल्हा नियोजन समितीच्या सन 2024-25 च्या प्रारुप आराखडयास मंजूरी

Image
    रायगड,दि.08(जिमाका) :-    रायगड जिल्हा वार्षिक   योजना 2024-25 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण रु.386.06 कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.   जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, खा.श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, रविंद्र पाटील, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, महेश बालदी,  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. सन 2024-25 साठी सर्व यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादनुसार जिल्हा नियोजन समितीने रु. 325.00 कोटीच्या आराखड्यास मान्यता दिली. अनुसुचित जा...

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

Image
  रायगड (जिमाका) दि.4 :-  ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या शुक्रवार दि.5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देवून तयारीची पाहणी केली.        यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.     पालकमंत्री श्री.सामंत यांनी व्यासपीठ, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शि‍बिर स्थळ, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आद...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
         अलिबाग, दि. 3 (जिमाका):- भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       यावेळी तहसीलदार (सा.प्र.)उमाकांत कडनोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते. 000000

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 जानेवारी रोजी वाहतूकीत बदल

  रायगड (जिमाका)दि.3:   रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी'  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत . शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय, कार्यकर्ते येणार असून सुमारे 2 हजार बसेस व इतर लहान मोठी वाहने घेवून उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना म्हणून दि.05 जानेवारी 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून दि.05 जानेवारी 2024 रोजी रात्रौ 23.00 वाजेपर्यतच्या कालावधीत दूध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे. ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्ग क्र.66 या म...