Posts

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी ऐवजी 29 फेब्रुवारी ते 01 मार्च रोजी होणार

  रायगड,दि.21(जिमाका):- मुख्यमंत् री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि.24 आणि 25 फेब्रुवारी 2024  रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत...

हापूस आंबा थेट विक्रीसाठी नोंदणीला 15 फेब्रुवारी पासून सुरुवात

    रायगड,दि.21(जिमाका):-   महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम 2024 करीता आंबा उत्पादकांना आंबा विक्री करीता पुणे आणि राज्यातील/परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्या करीता आंबा उत्पादकांची नोंदणी दि.15 फेब्रुवारी 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. स्टॉल नोंदणी करीता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागिल 6 महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणा-या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे नावे रु.10,000/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ.कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.  इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर,नाचणे,जि.रत्नागिरी (02352-299328) अथवा कृ...

म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Image
    रायगड दि.17 (जिमाका) :-  महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.43 कोटी इतक्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. म्हसळा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, खासदर सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान प...

महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर

Image
रायगड दि.16 (जिमाका) :-  निर्माता रत्नकांत जगताप यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याऱ्या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. 'जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय. !' या जयजयकारांने परिसर दूमदुमला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदानावर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम काल झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.        स्थानिक कलाकार अमोल कापसे यांनी सादर केलेला अवतार गाथा 'कार्यक्रम उपस्थितांचे उत्कृष्ट मनोरंजन करुन गेला. यानंतर 'महाराष्ट्राची लोकधारा' या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. गणेश नमनाने दमदार सुरुवात करत 'बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..' तसेच 'कानडा राजा पंढरीचा' अशा गीतातून साकारलेल्या  पंढरीच्या वारीने उपस्थित रसिकांनाही वारकरी बनविले. 'झूंजूमुंजू पहाट झाली.., नभं उतरु आलं....

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

  रायगड दि.16(जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि.19 मार्च 2024  या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दि.01 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबईचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे. या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.15 फेब्रुवारी 2024 पासून कार्यान्व...

अनुसूचित जाती (sc) प्रवर्गासाठीचे 18 दिवसीय निवासी उद्योजकीय प्रशिक्षणाचे समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

    रायगड दि.16(जिमाका) :-   उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शांसन  मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) रायगड आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक,व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण नुकतेच आज अलिबाग येथील तारांगण रिसॉर्ट मध्ये सामारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगडचे  प्रकल्प अधिकारी  आनंद विद्यागर, उद्योजक ज्ञानदेव खंडारे, प्राध्यापक श्री.आचार्य, दयानंद चतुर  हे उपस्थित होते. यावेळी श्री.विद्यागार यांनी  मार्गदर्शन  करुन   मागील 18 दिवसांचा  प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला.  त्यामध्ये उद्योग निवडी पासून उद्योग सुरु करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.  उद्योग संधिशोध CFTRI डायरेक्टर  डि.के. आहुजा, इंड...

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी

    रायगड दि.16(जिमाका) :-  रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली रसायनी रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तीमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मिक घटना घडत असतात.  त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थितो निर्माण होत आहे. दि. 23 जानेवारी 2024 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समितो महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्याध्यक्ष,श्री.जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे,कोळीवाड्याचे सिमाकंन करावे, मच्छिमार बांधवाना उर्वरित डिझेल परतावा मिळावा इतर मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उप...