Posts

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे दि.21 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

    रायगड दि.21(जिमाका):- मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई  यांच्या कार्यालया‌द्वारे  दि.21 जून 2024 रोजी, दुपारी 3.00 वाजता 127 वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई 400001 यांच्याकडे दि.07 जून 2024  पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर  यांनी केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे. 000000

अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग येथे दि.14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

    रायगड दि.21 (जिमाका):-  अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालया‌द्वारे दि.14 जून 2024 रोजी, सकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे दि.06 जून 2024 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर  यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे.. 0000000

चालू वर्षी दि.01 जून ते 31 जुलै 2024 या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

    रायगड दि.20(जिमाका):- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून 2024 ते दि.31 जुलै 2024 (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे.      या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.      राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्...

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यास बंदी

  रायगड दि.20(जिमाका):- Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांना दरवर्षी दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात सुरक्षिततेच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येते. त्यानुसार Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील जलयानांना दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024  या कालावधीत सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारितील बंदरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, राजपुरी बंदरे समूह कॅ.सी..जे.लेपांडे यांनी कळविले आहे. ००००००

गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

    रायगड दि.16(जिमाका)   :-  गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.17 मे 2024  रोजी सकाळी 3.00 ते सकाळी 8.00   वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी  जारी केली आहे. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास  मार्गे नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत. भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून  वेलवली  ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाह तू क करण्याचे काम  Total Movements  Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे.  सेलची लांबी 10.20. रूंदी 5.97 मिटर व उंची 5.52 मिटर व लांबी 7.70 मिटर, रुंदी 5.97 मिटर व उंची 5.63 मिटर आहे. अलिबाग ते रोहा रस्ता रा.प.म.91 किलोमीटर 2/200 ते 14/00 दरम्...

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      रायगड,दि.16(जिमाका):-  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि.रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटूबांतील विद्यार्थींनी 5 टक्के, विशेषमागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थींनींकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृहात 8 वी ते 10 वी च्या प्रवेशितांना अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनाम...

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 10 जून पूर्वी अर्ज सादर करावेत

    रायगड,दि.15(जिमाका):-  सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि.10 जून 2024 पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण ता.पेण येथे सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.   या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी असावी, इयत्ता 1 ली ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, वय 31 डिसेंबर 2024 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा ...