Posts

राज्यात कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-याना कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  रायगड, दि .5:-- कृषि विभागामार्फत सन २०२३ या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती / गट / संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी/गट / संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करणेसाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रविंद्र बिनवडे, भाप्रसे, आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव ना...

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धांचे अलिबाग येथे आयोजन

रायगड, दि .5:--जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धांचे १० ते १२ जुलै कालावधीत अलिबाग येथे करण्यात येत आहे. संघ नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक  https://forms.gle/fcea& QfhtemGKnL.CA  उपलब्ध करुन देण्यात येत आहे. स्पर्धां  पोलीस मुख्यालय, अलिबाग ता. अलिबाग जि. रायगड येथे होतील. वयोगट १५ वर्षांखालील मुले व १७ वर्षाखालील मुलींसाठी गुगल फॉर्म व्दारे नोंदणी दि.०९ जुलै सायं.४ वाजेपर्यंत आहे. संघ उपस्थिती दिनांक १० जुलै सकाळी ९ वा. तर स्पर्धा कालावधी १० जुलै ते ११ जुलै आहे. १७ वर्षाखालील मुले गुगल फॉर्म व्दारे नोंदणी दि.०९ जुलै सायं.४ वाजेपर्यंत आहे. संघ उपस्थिती दिनांक ११ जुलै सकळी ९ वा. तर स्पर्धा कालावधी ११ जुलै ते १२ जुलै आहे. १५ वर्षाखालील मुले  दि.०१ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा १७ वर्षाखालील मुले व मुली दि.०१ जानेवारी २००८ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा. गुगल फॉर्म मधील नोंदणी नुसार ज्या संघांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत, अशाच संघाची भाग्य पत्रिका दि.०९ जुलै रोजीच तयार करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.  एकाव...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 एक रुपयात विमा

रायगड, दि .5:--खरीप हंगामात  विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिक नुकसानीला आर्थिक संरक्षण होण्यासाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 असुन  त्याअनुषंगाने शासनचे पिकविमा पोर्टल  www.pmfby.gov.in  सुरु केले आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. खरीप हंगामास सुरुवात झाली असुन  या विमा योजनेत भात, नाचणी आदी पिके समाविष्ट आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पिक पाहणी मध्ये करावी.  या वर्षी भात पिकामध्ये महसुल मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमांट सेंसीग तंत्रज्ञानाचा वापर करुन येणाऱ्या उत्पादनास 40 टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वा...

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणार --महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे योजनेला गती देण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

  मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करुन तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालय येथे  बैठक प्रसंगी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यासह विविध अधिकारी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स सहभागी झाले होते. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.  पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये लाभ देण्यात ये...

आदिवासी मुलांचे/मुलींचे 13 वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शासकीय वसतिगृह प्रवेश सुरु

       रायगड, दि. 3 (जिमाका) ;- आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इ.8वी पासुन पुढील शिक्षणाकरिता रायगड  मध्ये पेण (मुले), कर्जत (मुले), नेरळ (मुले), पनवेल खांदा कॅालनी (मुले), पनवेल नविन (मुले), महाड (मुले), सुधागड (मुले), नागोठणे (मुले), पेण (मुली), पनवेल (मुली), नेरळ (मुली), सुधागड (मुली) व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये  रत्नागिरी (मुले)  असे एकुण 13 वसतिगृहे कार्यान्वयित आहे.   वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता प्रवेश अर्ज  https://swayam.mahaonline.gov. in  या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक सुचना या सदर वेबसाईटवर दिलेल्या आहेत.  “ सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व निर्वाह भत्ता सोय व इतर शैक्षणिक सोयी सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. ” वसतिगृह प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणीकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड  येथील वसतिगृह विभागाशी संपर्...

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

                     रायगड, दि.03(जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहित महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  www.mahaswayam.gov.in  या  संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.                  त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे जून, 2024 अखेर संपणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in  या संकेत...

आरबीएसके-डीइआयसी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

Image
    रायगड (जिमाका),दि.02:-   जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने (शुक्रवार,दि.28 जून) रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी- घुगे यांच्या मार्गर्शनाखाली 0 ते 18 वयोगटातील  बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बाल अस्थीरोग तज्ञ डॉ.मुदीत शहा यांनी 17 बालकांची तपासणी केली व बाल मेंदूविकार तज्ञ डॉ.अंकित पांडे यांनी 24 बालकांची पूर्व तपासणी करून पुढील उपचारासाठी संदर्भित केले. या शिबिरासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज पाटील, डॉ. आशिष मिश्रा, आरबीसके समन्वयक सुनील चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता ज्ञानदीप भोईर, सायकॉलॉजिस्ट राजेश पवार, भौतिकउपचार तज्ञ प्रतिष्ठा नाखवा, स्पेशल एज्युकेटर सीमा विषे, अधिपरिचारिका, ऐश्वर्या थळे आदींनी सहकार्य केले. ००००००