जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धांचे अलिबाग येथे आयोजन



रायगड, दि .5:--जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धांचे १० ते १२ जुलै कालावधीत अलिबाग येथे करण्यात येत आहे. संघ नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक https://forms.gle/fcea&QfhtemGKnL.CA उपलब्ध करुन देण्यात येत आहे. स्पर्धां  पोलीस मुख्यालय, अलिबाग ता. अलिबाग जि. रायगड येथे होतील.

वयोगट १५ वर्षांखालील मुले व १७ वर्षाखालील मुलींसाठी गुगल फॉर्म व्दारे नोंदणी दि.०९ जुलै सायं.४ वाजेपर्यंत आहे. संघ उपस्थिती दिनांक १० जुलै सकाळी ९ वा. तर स्पर्धा कालावधी १० जुलै ते ११ जुलै आहे.

१७ वर्षाखालील मुले गुगल फॉर्म व्दारे नोंदणी दि.०९ जुलै सायं.४ वाजेपर्यंत आहे. संघ उपस्थिती दिनांक ११ जुलै सकळी ९ वा. तर स्पर्धा कालावधी ११ जुलै ते १२ जुलै आहे.

१५ वर्षाखालील मुले  दि.०१ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा १७ वर्षाखालील मुले व मुली दि.०१ जानेवारी २००८ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा.

गुगल फॉर्म मधील नोंदणी नुसार ज्या संघांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत, अशाच संघाची भाग्य पत्रिका दि.०९ जुलै रोजीच तयार करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.  एकावेळी एकाच संघाची नोंदणी करता येईल, एका पेक्षा जास्त वयोगटाचे संघ असल्यास एका संघाची नोंदणी पुर्ण झाल्यावर पुनःश्च दुस-या संघाची नोंदणी करावी. नोंदणी करतांना प्रवशिका शक्यतो Pdf मध्येच अपलोड करावी किंवा पीडीएफ साठी काही अडचण आल्यास Image मध्ये अपलोड करावी, नोंदणी केलेल्या शाळांनी स्पर्धेचे मुळ प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क प्रती संघ  रुपये एकशे पन्नास प्रमाणे स्पर्धास्थळी जमा करणे आवश्यक राहील.

संघासाठी सुचना नुसार खेळाडुंनी स्पर्धेसाठी आवश्यक गणवेश, बुट इत्यादी परिधान करणे व संघासह जबाबदार क्रीडा शिक्षक / मार्गदर्शक असणे आवश्यक राहील. आयोजकांनी स्पर्धा ठिकाणी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी क्रीडा शिक्षक / मार्गदर्शक यांची राहील.  संघातील सर्व खेळाडुंची शिस्त ठेवणे, खेळाडुंना सामन्यासाठी वेळेवर उपस्थित ठेवणे ही जबाबदारी क्रीडा शिक्षक / मार्गदर्शक यांची राहील. तसेच पंच / तांत्रिक अधिकारी यांनी दिलेले निर्णय अंतिम राहतील.

 स्पर्धा संपल्याखेरीज खेळाडु स्पर्धा ठिकाण सोडुन इतरत्र जाणार नाहीत याची जबाबदारी क्रीडा शिक्षक / मार्गदर्शक यांची राहील.या स्पर्धांसाठी वयोगटनिहाय जन्म तारखा  निश्चीत करण्यात आलेल्या आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन