नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक,सुलभ व विहित कालमर्यादेत मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू

 

 

रायगड-अलिबाग,दि.११ (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ हा नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ व विहित कालमर्यादेत मिळण्यासाठी लागू करण्यात आला आहे. नागरीकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शेकडो सेवा जसे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यु दाखले यासरख्या विविध शासकीय विभागांच्या एकुण १२१२ सेवा या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या असून या सेवा नागरीकांना 'आपले सरकार' पोर्टलवरुन मिळवता येतील. याशिवाय नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रामधूनही या सेवा नागरीकांना उपलब्ध करुन घेता येतील.

पात्र नागरीकांना या सेवा विहित वेळेत न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय सेवा नाकारण्यात आली तर प्रथम व द्वितीय अपील संबंधित कार्यालयातील प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकाऱ्याकडे करण्याचा अधिकार आहे. तद्नंतरही सेवा न मिळाल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्याविरुद्ध सेवा हक्क आयोगाकडे तृतीय अपिल करता येईल. तसेच पुरेशा व वाजवी कारणाशिवाय सेवा देण्यास विलंब झाल्यास संबंधित कसूरदार अधिकाऱ्यास रु.५०००/- पर्यंत दंड होवू शकतो.

संकेतस्थळ - https://aaplesarkar.mahaonline.gov.in, आपले सरकार सेवा केंद्र QR Code

राज्य सेवा हक्क आयोग, कोकण महसुली विभाग कार्यालयाचा पत्ता -राज्य सेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय,कोकण महसूली विभाग, कोकण भवन कक्ष क्र ७२१/७२७, ७ वा मजला, कोकण भवन, नवी मुंबई-४००६१४ दूरध्वनी क्र. ०२२-२०८७०५१५,ईमेल- crts.konkan@maharashtra.gov.in.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन