सेवा संकल्प अभियान' अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये पिडीतांना भेट
रायगड-अलिबाग, दि.30 (जिमाका) : : 'एक दिवा आशीर्वादाचा' या लोककल्याणकारी योजनेच्या जनजागृतीसाठी आणि सेवा संकल्प अभियान दि. 17 सप्टेंबर 2026 ते दि. 17 ऑक्टोबर 2026 या काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत ता. उरण येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार पिडीत सुरेंद्रकुमार शिंदे यांच्या घरी (दि. 22 सप्टेंबर 2026) रोजी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाची काळजीने चौकशी केली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये पिडीताना आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच यावेळी सुरेंद्रकुमार शिंदे व त्यांचे कुटुंबाची उपस्थिती होती. योजनेअंतर्गत मिळालेल्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी लाभार्थी सुरेंद्रकुमार शिंदे यांनी शासनाच्या अर्थसहाय्य योजना व इतर मदतीमुळे कुटुंबाला जीवन जगण्यास खूप मदत झाल्याच मत व्यक्त केल. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि योजनांच्या लाभामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
0000000
Comments
Post a Comment