श्री गणेशा आरोग्याचा-२०२६ नियोजन आढावा बैठक संपन्न

 

रायगड-अलिबाग, दि.११ (जिमाका): मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,रायगड  यांच्या वतीने आगामी श्री गणेशा आरोग्याचा २०२६ या आरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित अधिकारी पदाधिकारी व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गणेश मंडळे अध्यक्ष, CMRF,MJPJAY,Charity, Government Hosptals यांची आढावा बैठक संपन्न झाली .

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक (CS), जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH), VVCMC, धर्मादाय रुग्णालय कार्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) समन्वयक तसेच संबंधित रुग्णालये, गणेश मंडळे अध्यक्ष,आरोग्य सुविधांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीमध्ये आगामी अभियानाच्या नियोजन,समन्वय, आरोग्य शिबिरांचे आयोजन, आवश्यक मनुष्यबळ व सुविधा तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास पवार यांनी श्री गणेशा आरोग्याचा अभियान नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी रायगड,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधितांना आवश्यक सूचना व जबाबदाऱ्या स्पष्टपणे देण्यात आल्या. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.श्री गणेशा आरोग्याचा २०२६ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत व्यापक आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.

रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक ठिकाणी एकूण ५०० हून अधिक आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आलेले आहे.   जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन