अपिल प्रकरणांसाठी महात्मा ज्योतीराव फुले लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन उपस्थित राहावे


रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका): महसूल व वनविभाग यांच्याकडील दि.13 ऑगस्ट 2026 च्या शासन  निर्णयान्वये भूमि अभिलेख विभाग, रायगड, अलिबाग यांच्यातर्फे प्रलंबित अपिल प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय, आवार व जुने तहसिल कार्यालयाच्या आवारात कचेरी रोड माणगाव येथे महात्मा ज्योतीराव फुले लोक अदालतीचे आयोजन करण्यात  आले असून नागरिकांनी व अपिलकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेवून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुनिल इंदलकर यांनी केले आहे.

महसूल लोक अदालतीचे ठिकाण :- जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, रायगड क्र.1 अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, अलिबाग, अंतर्गत तालुके- अलिबाग, पेण, पनवेल, उरण, मुरुड, कर्जत, खालापूर, महसूल लोक अदालतीचा दिनांक- मंगळवार, दि.6 ऑक्टोबर 2026, वेळ-दुपारी 12.00 वाजता.

महसूल लोक अदालतीचे ठिकाण :-जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, रायगड क्र.2 अलिबाग, जुने तहसिल कार्यालयाचे आवारात, कचेरी रोड, ता.माणगाव, अंतर्गत तालुके- माणगाव, सुधागड, महाड, पोलादपूर, म्हसळा, तळा, रोहा, श्रीवर्धन, महसूल लोक अदालतीचा दिनांक- बुधवार, दि. 7 ऑक्टोबर 2026, वेळ-दुपारी 12.00 वाजता.

या लोक अदालतीमध्ये रायगड विभागातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे, जेणेकरून प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल.लोक अदालतीद्वारे तातडीने व पारदर्शक पद्धतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, त्यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे.

नागरिकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड क्र.1 अलिबाग यांच्या कार्यालयाशी अथवा व्हॉटस अॅप नं.8308311010 वर केवळ व्हॉटस अॅप संदेशान्वये संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड