सेवा संकल्प अभियान' योजनेच्या जनजागृतीसाठी गटई स्टॉलला भेट
रायगड-अलिबाग, दि.30 (जिमाका) : मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच 'एक दिवा आशीर्वादाचा' या लोककल्याणकारी योजनेच्या जनजागृतीसाठी आणि सेवा संकल्प अभियान (दि. 17 सप्टेंबर 2026 ते दि. 17 ऑक्टोबर 2026) अंतर्गत (दि.24 सप्टेंबर 2026) रोजी अलिबाग येथील लाभार्थी प्रभाकर नारायण भालकर यांच्या गटई स्टॉलला भेट देण्यात आली.
यावेळी श्री. भालकर यांच्या व्यवसायाची पाहणी करून त्यांच्या व्यवसायाबाबत तसेच योजनेअंतर्गत मिळालेल्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, उपलब्ध सुविधा आणि व्यवसायातील प्रगती याबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
यावेळी लाभार्थी प्रभाकर नारायण भालकर यांनी, "गटई स्टॉलमुळे पावसाळ्यात पाण्यापासून तसेच उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण मिळत असून, त्यामुळे व्यवसाय करण्यास मोठी सुविधा झाली आहे. व्यवसायामध्येही चांगली वाढ झाली आहे," असे मनोगत व्यक्त केले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि योजनांच्या लाभामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
00000000
Comments
Post a Comment