गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा


 

रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच पाली फाटा (खोपोली)-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण व पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी, तळ कोकणात जात असतात. त्यामुळे दि. १४ सप्टेंबर रोजीच्या गणेश प्रतिष्ठापना तसेच त्यानंतरच्या कालावधीत महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी झाल्यास वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : पेण येथे कोंडी झाल्यास- तरणखोपपेण बायपासगागोदेवरसईपाली फाटापरळीजांभुळपाडापालीवाकण. वडखळ येथे कोंडी झाल्यास-वडखळ-पोयनाडपेझारी चेकपोस्टकुडूसनागोठणेवाकण.

नागोठणे येथे कोंडी झाल्यास : नागोठणेवेलशेत फाटावरवठणेभिसेखिंडवाकण. नागोठणेवेलशेत फाटावरवठणेभिसखिंडरोहावाकण.

वाकण-नागोठणे येथे कोंडी झाल्यास : वाकणपालीनांदगावविळेसुतारवाडीकोलाड. वाकणपालीनांदगावविळेनिजामपूमाणगाव. वाकणपालीनांदगावविळेनिजामपूमाल्याचीवाडीबोरवाडीजांभुळवाडीढालघर.

 

कोलाड येथे कोंडी झाल्यास :कोलाडसुतारवाडीविळेनिजामपूरमाणगाव.माणगाव येथे कोंडी झाल्यास :माणगावनिजापूर नाकासाईराम हॉटेल ब्रिजमुगवली ब्रिज.लोणेरे येथे कोंडी झाल्यास :लोणेरेगोरेगावनांदवीआंबेतम्हाप्रळ. राजेवाडी फाट्यापुढे पोलादपूरच्या दिशेने कोंडी झाल्यास : टोळफाटा (महाड)–आंबेतम्हाप्रळ.ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. ११ सप्टेंबर २०२६ पासून दि. २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन