Posts

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
दिनांक :- 10 नोव्हेंबर  2016                                                                                         वृत्त क्र. 715 कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न अलिबाग,दि.10 (जिमाका) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सन 2016 या वित्तिय वर्षातील नियोजित कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधिश,तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय विधी सेवा दिवस(National Legal Services Day) या दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 9 नोव्हेंबर2016 रोजी दिवाणी न्यायालय व. स्तर ...

राष्ट्रीय लोक अदालत - जलद न्यायासाठी सशक्त पर्याय

Image
लेख क्र. 56                                                                                           दिनांक: 7/11/2016 राष्ट्रीय लोक अदालत - जलद न्यायासाठी सशक्त पर्याय कोणतीही निरपराध व्यक्ती न्याय प्रक्रियेत दोषी ठरु नये तसेच कुठलीही व्यक्ती न्याय मिळण्यापासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून न्यायदान प्रक्रिया सुरु असते.  त्यामुळे काही वेळा कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होण्यास विलंब लागतो. यामुळे न्याय मिळण्यास उशीर लागतो.  सर्वसामान्य माणसाला छोट्या-छोट्या दाखल्यासाठी न्यायालयात जावे लागते.  हे टाळण्...

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

दिनांक:-5 नोव्हेंबर 2016                                                                      वृत्त क्र.707 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत अलिबाग,दि.5:-(जिमाका)रायगड जिल्हयातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आणि नगरपरिषद अध्यक्षांची थेट निवडणूक कार्यक्रम 2016-17 करिता प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली समिती  स्थापन  करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत. अपर जिल्हाधिकारी, रायगड, पोलिस उपअधिक्षक(गृह),अलिबाग, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा नामनिर्देशित प्रतिनिधी, संबंधित प्रभागाचे न...

पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक कळविणे बंधनकारक 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत

दिनांक :- 0 4/11/2016                                                                         वृ.क्र. 704 पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक कळविणे बंधनकारक 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत अलिबाग,दि.4:- (जिमाका) पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना त्यांचा आधार क्रमांक संबधित दुकानदाराला कळविले बंधनकारक करण्यात आले आहे.  आधार कार्ड क्रमांक कळविण्यासाठी 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  सद्यस्थ्‍िातीत जे लाभार्थी शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत आहेत अशा शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारकार्ड संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा केल्याची खात्री लाभार्थी  धारकांनी स्वत: करुन घ्यावी. कुटूंबां...

रायगड जिल्हा परिषद प्रभाग रचना, आरक्षण व सोडत सुधारित कार्यक्रम

दिनांक :- 04/11/2016                                                                वृ.क्र.701 रायगड जिल्हा परिषद प्रभाग रचना,  आरक्षण व सोडत सुधारित कार्यक्रम अलिबाग दि.04 (जिमाका) रायगड जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 15 पंचायत समित्याच्या सार्वत्रिक निवडणुका 2017 करिता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.   पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे त्यात समाविष्ट असलेली 29 गावे वगळावी लागल्यामुळे यापूर्वी जाहिर करण्यात आलेला प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 1) प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता आरक्षणासह) विभागीय...

अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

Image
दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                 वृत्त क्र. 696 अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा अलिबाग, दि.28:- आयुष कार्यक्रमांतर्गत  आज अलिबाग येथील  जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली.             या कार्यक्रमांस, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्य् चिकित्सक  डॉ.ननावरे,, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आयुष अधिकारी,डॉ.चेतना पाटील तसेच  आयुर्वेद व आहारतज्ञ डॉ. भक्ती पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी मधुमेह जनजागृती अभियानासाठी आयुष विभाग रायगडद्वारे मुद्रीत केलेल्या माहिती पत्रकाचे अनावरण ...

आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रे सुरु

Image
दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 695                                          आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी                                                 ग्राम बाल विकास केंद्रे सुरु      ...