Posts

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

Image
दिनांक :-  26/11/2016                              वृत्त क्र . 755   नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी  मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे -     राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया अलिबाग दि .२६ - (जि.मा.का) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील पात्र मतदारांनी मनात संभ्रम शंका न ठेवता निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज खोपोली येथे केले. दि.२७ नोहेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यास ते दौऱ्यावर आले होते.       यावेळी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत  दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद  दीपक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर आधी उपस्थित होते.    ...

भारतीय संविधान -आमचा अभिमान

Image
दिनांक :- 25 नोव्हेंबर 2016                                                     लेख क्र.58 भारतीय संविधान -आमचा अभिमान             जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगालाही मोठी देणगी दिली आहे. आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झाले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या घटनेला जवळपास 67 वर्षे पुर्ण होत आहेत.            आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे उद्गाते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ, दलितांचे कैवारी, एक चाकोरीबाह्य असे उत्तुंग व्यक्तीमत्व अशी कितीतरी विशेषणे ज्यांना लावली त...

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:-  25/11/2016                                                                                                  वृत्त क्र. 750 मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे                                                    --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले ...

क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रामाची आवश्यकता -देवदत्त नागे

Image
क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रामाची आवश्यकता                                                                                      -देवदत्त नागे              अलिबाग दि.21:- (जिमाका)  -    क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन जय मल्हार मालिकेतील   “ श्री खंडेराय यांची भुमिका साकारलेले  देवदत्त नागे यांनी राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य च्य...

मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया

Image
दिनांक :- 17 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 730 मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी                                                    -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया                 अलिबाग दि. 17 : (जिमाका) नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती...

राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न

Image
दिनांक  :- 15 नोव्हेंबर  2016                                                  वृत्त क्र. 723 राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न अलिबाग,दि.15 (जिमाका) सदस्य सचिव,राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली  यांच्या पत्रानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनानुसार 12 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा न्यायालयात  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.             या कार्यक्रमाचेवेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर अलिबाग तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग एल.डि.हुली,  मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग मु.गो.सेवलीकर आणि अन्य न्यायिक अधिकारी प्रविण एम.ठाकूर, अध्यक्ष वकिल संघटना अलिबाग व अन्य वकिल ...

आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन

दिनांक :- 16 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 726 आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला  व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन अलिबाग,दि.16 (जिमाका) कृषि विभागामार्फत कोकण विभागात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन ही योजना 15 नोव्हेंबर 2016 ते 31 मे 2017 या कालावधी मध्ये सुरु करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवळी कृषि विद्यापीठातील शास्त्राज्ञांमार्फत विविध किड व रोगांवर मार्गदर्शन मिळणार आहे.  उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली यांचे अंतर्गत सदर योजनेसाठी कर्जत, खालापूर,पनवेल व उरण या तालुक्यांचा समावेश  करण्यात आलेला आहे.  या चारही तालुक्यात किड सर्व्हेक्षक व मॉनिटर यांच्यामार्फत आंबा उ...