Posts

प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी केंद्र शासन कटिबध्द ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

Image
दिनांक:- 3/12/2016                                                                                             वृत्त क्र. 773             प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी केंद्र शासन कटिबध्द                                               ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अलिबाग,  दि....

जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन

Image
दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 771 जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग, दि.01 :- (जिमाका) जागतिक एड्स दिन 2016 निमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्यातर्फे रॅलीचे आयोजिन करण्यात आले होते.  रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या प्रसंगी त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ डॉ.श्री.ननावरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, ...

आयुष व महिला मंडळातर्फे मधुमेह जनजागृती अभियान संपन्न

Image
दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 772 आयुष व महिला मंडळातर्फे मधुमेह जनजागृती अभियान संपन्न अलिबाग,दि.1(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेमार्फत कुळस्वामी महिला मंडळ,पोयनाड आयुष विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह जनजागृती अभियान संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती श्रीमती चित्रा पाटील या उपस्थित होत्या.             या कार्यक्रमांत मार्गदर्शन करतांना सौ.चित्राताई पाट...

मुलगा आणि मुलगी यात फरक मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

दिनांक:-30/11/2016                                                            वृत्त क्र. 765 मुलगा आणि मुलगी यात फरक  मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक                         ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले अलिबाग दि.29:- (जिमाका)  आपल्या अपघातानंतर प्रबल इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभी राहत इंग्लड ते महाड असा 32 हजार कि.मी.प्रवास एकटयाने करणारी भारतीय महिला ही किती सक्षम आहे हे भारुलता कांबळे यांच्या बेटी बचाओ,बेटी पढाओ या मोहिमेद्वारे सिध्द झाले आहे.  त्यामुळे मुलगा  व मुलीमध्ये भेद करणारी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ मत्री राजकुमार बडोले यांनी  आज येथे केले.  श्रीमती भारुलता कांबळे यांनी इंग्लड ते भारत असा एकटीने कार प्रवास करुन  मुलगी वाचवा,मुलगी शिकवा तसेच महिला सक्...

राज्य निवडणूक आयुक्त यांची रायगड जिल्हयात मतदान पहाणी

Image
दिनांक:-  27/11/2016                                               वृत्त वि. क्र.756                             राज्य निवडणूक आयुक्त यांची                             रायगड जिल्हयात मतदान पहाणी             अलिबाग दि. 27:-   राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज रायगड जिल्हयात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीची मतदान पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकार...

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया

Image
दिनांक :-  26/11/2016                              वृत्त क्र . 755   नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी  मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे -     राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया अलिबाग दि .२६ - (जि.मा.का) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील पात्र मतदारांनी मनात संभ्रम शंका न ठेवता निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज खोपोली येथे केले. दि.२७ नोहेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यास ते दौऱ्यावर आले होते.       यावेळी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत  दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद  दीपक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर आधी उपस्थित होते.    ...

भारतीय संविधान -आमचा अभिमान

Image
दिनांक :- 25 नोव्हेंबर 2016                                                     लेख क्र.58 भारतीय संविधान -आमचा अभिमान             जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगालाही मोठी देणगी दिली आहे. आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झाले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या घटनेला जवळपास 67 वर्षे पुर्ण होत आहेत.            आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे उद्गाते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ, दलितांचे कैवारी, एक चाकोरीबाह्य असे उत्तुंग व्यक्तीमत्व अशी कितीतरी विशेषणे ज्यांना लावली त...