Posts

मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार ध्वजदिन निधी संकलन

मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार  ध्वजदिन निधी संकलन अलिबाग दि.16 (जिमाका):-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अंतर्गत रायगड जिल्हयात मे-2017 मध्ये रुपये 3 लाख 38 हजार 759 रुपये इतका ध्वजदिन निधी  संकलित करण्यात आला आहे.  मागील महिन्याच्या अखेर झालेला संकलन निधी 13 लाख 06 हजार 213 रुपये असा एकूण  16 लाख 44 हजार  972 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 30.21 इतकी आहे. जिल्हयाला या वर्षासाठी रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 000

जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ

जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य् अभियान अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त्‍ योग जनजागृती अभियानाचा शुभारंभ  करण्यात आला. यावेळी एसओएस व्हिलेज व आयुष विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तिनवीरा, ता.अलिबाग येथील आदिवासी वाडीवरील मुलांसाठी योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.             या प्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, आर्ट ऑफ लिव्हींगचे योगमार्गदर्शक श्री.दामोदर पाटील,जिल्हा सामान्य रुग्णालय येथील योग प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक श्री.रुपेश पाटील,एसओएस व्हिलेजचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री. संजय कचरे व सौ.रिमा सावंत,शिक्षिका श्रीम.जिवीता पाटील,श्रीम तहसीन छापेकर, श्रीम.अस्मिता नाईक,श्रीम.योगिता पाटील, व मान्यवर उपस्थित होते.             एसओएस व्हिलेजद्वारे राबविण्यात येणाऱ्या आदीवासी कुटूंब सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत निरनिराळया ...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन अलिबाग दि.16,(जिमाका):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड येथे शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत अ.भा.व्यवसाय परीक्षा दिलेल्या परीक्षार्थी ह्यांना आवाहन करण्यात येते की, एप्रिल-2016 च्या परीक्षेपर्यंत सर्व अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र ह्या संस्थेत प्राप्त झालेली आहे. तरी संबंधित उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांना मूळ गुणपत्र व फोटो पासपोर्ट साईज घेऊन, प्रमाणपत्र संस्थेतून सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे असे असे आवाहन संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. एस.व्हि.पाटील,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड यांनी केले आहे. 0000000000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत शनिवार 17 जून 2017 रोजी दुपारी 2.15 वाजता वकिल संघटना कक्षामध्ये Mediation Awareness Programme मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे एल.डी.हुली,सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 000000 

रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम

Image
लेख क्र. 22                                                                                                            दि.13.6.2017 रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो   जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम,शिक्षणाचा दर्जा,देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा याची माहिती देण्याबरोबरच जि.प.शाळेत वि द्या र्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी जिल्हा परिषद रायगड मार्फत राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम… होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो...

आपला महाराष्ट्र बाल कामगार मुक्त

12 जून- बाल कामगार मुक्त दिनानिमित्त लेख आपला महाराष्ट्र  बाल कामगार मुक्त बालकामगार या विषयाने समस्त मानव जातीला अंतर्मुख केलेले आहे. बालकामगार ही एक जटील समस्या असून त्याचे दुष्परिणाम समाजातील प्रत्येक घटकास भोगावे लागत आहेत. आजचे बालक ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. बाल कामगार या शब्दामध्ये बालक काम व श्रम या तीन शब्दांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्त्ती 14 वर्षापेक्षा वयाने कमी आहे अशा व्यक्तीस बाल  कामगार कायद्यान्वये बालक संबोधले जाते. समाजामध्ये सर्वसाधारणपणे काम आणि श्रम या गोष्टींना समाज मान्यता आणि  महत्व असले तरी देखील बालकांच्या संदर्भात तो शाप ठरला आहे. नफेखोर दृष्ट प्रवृत्तीचे संस्था मालक स्वत:च्या फायद्यासाठी बालकांना वेठीस धरुन अत्यंत कमी मोबदल्याचे स्वरुपात आर्थिक व शारीरिक पिळवणूक करुन त्यांच्या असहाय्यतेचा पुरेपूर फायदा घेतात. याचे मुळ कारण पालकांची निरक्षरता, अज्ञान आणि गरिबी. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बालकाच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता...

रायगड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा

वृत्त क्र.305                                                                                                  दिनांक:- 09 जून 2017 रायगड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा अलिबाग दि.9,(जिमाका):-रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 सेमी ते 12 सेमी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (12 सेमी ते 24 सेमी) पाऊस पडण्याची पूर्वसूचना दिली आहे. तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे.             अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व सं...