Posts

स्वाईन फ्लूःलक्षणे आणि प्रतिबंध

स्वाईन फ्लू श्वसनसंस्थेच्या तीव्र लक्षणांसाठी ओळखला जातो. स्वाईन फ्लू   हा एक   विषाणूजन्य प्रकारचा संसर्गजन्य विकार आहे.   स्वाईन फ्लू बद्दल काळजीची गोष्ट अशी आहे की स्वाईन फ्लू चा विषाणू लवकर पसरतो आणि एकाच वेळी अनेक   लोकांना त्याची लागण होऊ शकते. जुलै 2009 पासून स्वाईन फ्लू च्या रुग्णांची संख्या साथीच्या प्रमाणात वाढली आणि तो आताशा मोठा चर्चेचा व चिंतेचा विषय   बनला आहे. केलेल्या   परिक्षणात मॅक्सिकोने नववी कि नवीन H1N1 विषाणूची नोंद करण्यात आ ली. जागतिक आरोग्य संस्थेने 2009   साली स्वाईन फ्लू ला जागतिक साथ   (पॅडॅमिक)   म्हणून   घोषित    केले आहे.आजवर जगभरातील तब्बल 75 वेगवेगळ्या देशांना स्वाईन फ्लू ने प्रभावित केलेले आहे.             स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे व संसर्गजन्य रोगांच्या सहा पातळ्या असतात. जनावरांपासून जनावराला संसर्ग, जनावरापासून माणसाला संसर्ग,जनावरापासून माणूस   व माणसापासून दुसरा माणून,   माणसांच्या समुहातून दुसऱ्य...

बारावीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात आवाहन

अलिबाग जि. रायगड,(जिमाका)दि.9-   सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात इ.12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी  करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी आपले अर्ज परिपूर्ण भरुन आपल्या कनिष्ठ् महाविद्यालयामार्फत दि.31 डिसेंबर 2017 पूर्वी जिल्हा जात पडताळणी समिती,रायगड येथे   दाखल होतील याची दक्षता घ्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.31 डिसेंबर 2017 अशी आहे. अर्ज वेळीच दाखल न झाल्यास होणाऱ्या परिणामास समिती जबाबदार राहणार नाही. यासंदर्भात  प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा जात पडताळणी समिती,रायगड पत्ता- 2 रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत, गोंधळपाडा,अलिबगा रायगड येथे त्वरीत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17.18 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.9-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.18मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3653. 04 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 04.00 मि.मि., पेण-35.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-19.00 मि.मि., उरण-09.00 मि.मि., कर्जत-19.60 मि.मि., खालापूर-11.00 मि.मि., माणगांव-69.00 मि.मि., रोहा-05.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-10.00 मि.मि., पोलादपूर-18.00, म्हसळा-04.20 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-33.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 274.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 17.18मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   116.24% इतकी आहे. 00000

प्रधानमंत्री पिक विमा योजना: शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यास बॅंकांसाठी 14 पर्यंत मुदत

             अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-   प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ 14 ऑक्टोंबर, 2017 पर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरले जाणार असून त्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून सुध्दा नुकसान भरपाईसाठी विचारात घेतली जाणार आहे. तरी सर्व संबंधित बँकानी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती 14 ऑक्टोंबर, 2017 पूर्वी संकेस्थळावर अपलोड करावी. असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

आढावा बैठक:मार्च 18 अखेर 21 पुलांची कामे पूर्ण होणार-ना. प्रकाश महेता

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-  रायगड जिल्ह्यातील 48 जुन्या पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून  त्यापैकी 21 पुलांची  दुरुस्ती, पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 7 पुलांची कामे पूर्ण झाले असून  उर्वरित 14 कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज येथे व्यक्त केला. ना.महेता यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेवाळे,  महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता तपासे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिक्षक अभियंता मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक एस. नंदनवार, जिल्हा उ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.:-7   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.89मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3615. 42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 08.00 मि.मि., पेण-25.02 मि.मि., मुरुड-35.00 मि.मि., पनवेल-04.20 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-18.80 मि.मि., खालापूर-31.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-105.00 मि.मि., सुधागड-66.00 मि.मि., तळा-34.00 मि.मि., महाड-08.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-50.20 मि.मि., श्रीवर्धन-07.00 मि.मि., माथेरान-28.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 494.22 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.89मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   115.04% इतकी आहे. 00000

कर्जत उपजिल्हारुग्णालयास सर्व सुविधांची पुर्तता करु- राज्यमंत्री ना. देशमुख

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधांची पुर्तता करुन स्थानिक आदिवासी व अन्य दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे  प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात आयोजित बैठकीत केले.             बैठकीला माजी आमदार देवेंद्र साटम, आरोग्य विभागाच्या उपसंचालिका श्रीमती रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन चव्हाण, डॉ.रामकृष्ण पाटील, विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरीक उपस्थित होते.             ना. देशमुख पुढे म्हणाले की, येथील रिक्त पदे भरुन कामकाजात सुसुत्रता आणणे, दुर्गम भागातील लोकांना वेळेवर उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या एक्सरे मशिन सुस्थितीत ठेवण्याच्या, पुरेसा औषधसाठा ठेवणे, क...