Posts

अलिबाग महोत्सव 2017 अलिबाग हे एकमेकाद्वितीय पर्यटनस्थळ- ना.जयकुमार रावल

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रीत प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्र किनारा असे एकमेवाद्वितीय पर्यटन स्थळ आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करु, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी आज येथे केले. अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग, नगर परिषद अलिबाग व महिला बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित अलिबाग महोत्सव 2017 च्या उद्घाटन प्रसंगी ना.जयकुमार रावल बोलत होते.             यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचत गट फेडरेशनच्या  चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नग...

पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे शनिवार दि. 23  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- शनिवार  दि. 23 रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबाग कडे प्रयाण. दुपारी चार वाजता श्री.आंग्रे होरिया बंगला, मोतीबाग अलिबाग यांची भेट. दुपारी साडे चार वाजता मोतीबाग अलिबाग येथून अलिबाग महोत्सव कार्यक्रमाकडे प्रयाण. सायं. पाच वाजता अलिबाग पर्यटन महोत्सव येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ अलिबाग समुद्र किनारा, सायं. सहा वाजता येथून शासकीय वाहनाने मांडवाकडे प्रयाण. सायं. सात वाजता मांडवा येथे आगमन व बोटीने मुंबईकडे प्रयाण. 00000

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवारी कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यामाने गुरुवार दि.28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात  राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच रायगड-अलिबागचे सदस्य श्रीकांत कुंभार  हे असून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन रायगड आणि वैद्यमापन शास्त्र रायगड या विभागातील वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तरी सर्वांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रम उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे यांनी केले आहे. 00000

पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर हे रविवार दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि. 24 रोजी दुपारी बारा वाजता रायगड जिल्हा शैक्षणिक वसतीगृह-समाज भवन भूमिपूजन सोहळा व समाज मेळाव्यास उपस्थिती. स्थळ :- मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड. दुपारी दोन वाजता मु.भादाव, ता.माणगांव, जि.रायगड येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. 00000

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिूकू इदाते यांचा रायगड जिल्हा दौरा

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-  राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष, भिकू इदाते हे सोमवार दि. 25  रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- सोमवार दि. 25 रोजी सकाळी सात वाजता पनवेल शासकीय शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोईनुसार मुंबईकडे प्रयाण. 00000

भूसंपादन अधिसुचनेबाबत हरकती मागवल्या

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-   माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग क्र.66(जुना-17) च्या चौपदरीकरणासाठी मौजे इंदापूर ते वडपाले या 84 कि.मी . ते 108.430 कि.मी. या दरम्यानची मौजे कशेणे, विघवली, तिलोरे, कळमजे, नाणोरे, जावळी, गारळ, तळेगांव त.गोरेगांव, रेपोली, उसरघर, लोणेरे या गावांच्या भूसंपादन क्षेत्राची राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 (1956 चा 48) मधील कलम 3A ची अधिसूचना 17 नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये (असाधारण, भाग-II, खंड-3 उपखंड(ii)) प्रसिध्द झाली असून सदरची अधिसूचना 15 डिसेंबर रोजी स्थानिक वर्तमान पत्र दै.रामप्रहर व दै.रत्नागिरी टाईम्स मध्ये प्रसिध्द झाली आहे. अधिसूचनेमधील जमीनी संबंधी कोणत्याही हितसंबंधीत व्यक्तींची तक्रार/हरकत असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आपले अर्ज उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांच्याकडे अधिसूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून 21 दिवसांत सादर करावेत, असे उपविभागीय अधिकारी माणगांव विभाग, माणगांव यांनी कळविले आहे. 0000 ०

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:-   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते   हे दि.22 व 23  डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम.   शुक्रवार दि. 22 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन. दुपारी चार वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून भरणे ता.खेड,जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सांय.आठ वाजता महाड एमआयडीसी रायगड येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.23 रोजी दुपारी दीड वाजता महाड एमआयडीसी रायगड येथून पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता पोलादपूर येथे आगमन. दुपारी साडे तीन वाजता पोलादपूर येथून चिपळूण जि.रत्नागिरी कडे प्रयाण. 0000 ०