Posts

शून्य दुर्घटना आणि पर्यटन वृद्धीचा 'प्रबळगड पॅटर्न'

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (डॉ. मिलिंद दुसाने)-   रायगड जिल्हा पर्यटनाचे उर्जावान केंद्र आहेच. पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी या ठिकाणी आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. पर्यटन वृद्धी सोबत हे पर्यटन सुरक्षित व सुकर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सुरक्षित आणि सुकर पर्यटनाचा हा प्रयोग त्यांनी प्रबळगड येथे राबविला. त्याचे परिणाम आता समोर आले असून   आता हा सुरक्षित पर्यटनाचा 'प्रबळगड पॅटर्न' म्हणून समोर येत आहे.             प्रबळगड हे पनवेल तालुक्यातील साहसी पर्यटकांचे 'हॉट डेस्टिनेशन'. या ठिकाणी ट्रेकिंग साठी जाणाऱ्या साहसी युवकांची संख्या खूप अधिक. अनेकदा पर्यटक दिशाभ्रमित होऊन हरवल्याच्या घटनाही   पूर्वी   घडल्या. नंतर प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना हुडकून सुरक्षित स्थळी आणावे लागल्याचे अनेक प्रसंगही सांगता येतील.             तथापि, हा धोका ओळखून...

Raigad goes Mobile....

Image
Alibag Dist.Raigad, 26 (DIO)- Tourism of Raigad Disrict is now available on mobile. Raigad District administration has launched a mobile aap. Taigad Gudardian minister Ravindra chavan announced this in Republic Day function.   “Raigad”   the mobile aap is   to promote tourism in the district. A brainchild of the Collector Dr. Vijay Surywanshi, the App will give information about Raigad district’s tourist attractions, sites, forts, history, beaches and more. A special feature is also the SOS button provided for tourists to contact the district administration in case of an emergency. Users can download it from the google play store or App Store.  The link for the App is available on the district website  https://raigad.nic.in   This app will boost tourism in Raigad, said Guardian minister Chavan. 00000

आदीवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचे हितगुज

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26- जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त   जिल्हाधिकारी बंगल्यावर आमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांना   जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटण्या बोलण्याची संधी मिळाली व स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.या सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे कुटूंबियही सहभागी झाल्याने हा सोहळ्या कौटुंबिक सोहळा झाला.              प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला निवृत्त ॲडमिरल एल. रामदास यांची सपत्निक उपस्थिती होते. या शिवाय जिल्हाधिकारी, त्यांच्या सहधर्मचारीणी डॉ.आरती सूर्यवंशी, त्यांचे अन्य कुटूंबिय या सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी   रविंद्र मठपती आदींसह जिल्ह्...

रायगड पर्यटनः मोबाईल ॲप पर्यटकांच्या सेवेत दाखल

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप आज पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले असल्याची घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज केली. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात   त्यांनी ही घोषणा केली.   या ॲप मध्ये जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली असून तेथे पोहोचण्याचे मार्ग, वाहतकीची साधने, त्यांच्या उपलब्धता, राहण्याची, जेवणाची उत्तम ठिकाणे , खाद्यपदार्थ आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांना आपत्ती प्रसंगी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांशी साधावयाच्या संपर्काची सोयही या ॲप मध्ये करण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याची लिंक https://raigad.nic.in   या रायगड जिल्ह्याच्या वेबसाईटवरही उपलब्ध करण्यात आली आहे. याॲपमुळे रायगड जिल्ह्याचे पर्यटन आता मोबाईलच्या सहाय्या...

प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा शेतकरी, कामगार,कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध- ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -   समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उस्ताहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हा निवडणूक...

प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- एकात्मिक फलोत्पादन विकास   अभियान सन 2018-19 मध्ये मनुष्य्बळ विकास कार्यक्रमांतर्गत फळबाग, भाजीपाला,फळबाग व्यवस्थापन,एकात्मिक किड व्यवस्थापन काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषि पर्यटन इत्यादी विषयावर खोपोली उपविभागाअंतर्गत खालापूर,कर्जत,पनवेल,उरण तालुक्यातील 80 शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील पाच दिवसांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training)सोमवार दि.4 ते 8फेब्रुवारी या कालावधीत उपविभाग सातारा,जिल्हा सातारा अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गुरुवार दि.31 रोजी सायंकाळी   चार वाजेपर्यंत नांव नोंदणी करावी,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली यांनी केले आहे. 00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार छाननी अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध ;आक्षेप-हरकती मागविल्या

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- सन 2017-18 या वर्षीच्या शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्काराचा प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.या संकेतस्थळावर राज्य क्रीडा पुरस्काराच्या लिंकवर क्लिक करुन www.xiroots.com या लिंकवर प्राथमिक छाननी पुरस्कार निहाय गुरुवार दि.24 पासून सोमवार दि.28 या कालावधीसाठी या.वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बाबत काही हरकत नोंदविण्याची असल्यास वरील संकेतस्थळाला भेट देवनू देण्यात आलेल्या विहीत नमुना डाऊन लोड करुन त्यामध्ये आपली हरकत,आक्षेप नमूद करावी व नमूद केलेली हरकत, आक्षेप पुन्हा त्याच संकेतस्थळावर दिनांक 28 पर्यंत अपलोड करावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 000000