अलिबाग, जि. रायगड, दि.6 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 7 पासून जिल्हास्तरीय भव्य कृषी, पशुप्रदर्शन,विक्री , चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याचे आयोजन पेण येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन हॉटेल मॉर्क्वीस मंथन शेजारी, मुंबई- गोवा महामार्ग पेण येथे होणार आहे, या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन व शेतकरी मेळावा दि. 7 ते 11 फेब्रुवारी असे पाच दिवस चालणार असून या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि.7 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पूनर्वसन व कृषी मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे राहणार असून मुख्य उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे या उपस्थित राहणार आहेत तर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील, पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटक विधानसभा सदस्य आ. सुभा...